भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (15 जानेवारी) सुरुवात झाली आहे. हा सामना ब्रिस्बेन येथील गाबा क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. हा सामना खेळायला उतरतानाच ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू नॅथन लायनने एक मोठा विक्रम केला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी आतापर्यंत 100 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याला ऑस्ट्रेलिया संघाकडून आणि कोचिंग स्टाफ कडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याचबरोबर नॅथन लायनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू आणि कोचिंग स्टाफ यांनी मैदानावर उपस्थित राहून, आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नॅथन लायनने ऑस्ट्रेलिया संघासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी 2011 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळताना त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
https://www.instagram.com/p/CKC59-8h10S/?igshid=1r9cf4gpwvo5a
सध्या ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू नॅथन लायन जगातील महान फिरकीपटूंपैकी एक आहे. हा खेळाडू क्रिकेट विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी मैदानावर गवत कापण्याचे काम करत होता. त्या दरम्यान त्याने बीगबॅश लीग टी-20 स्पर्धेत पदार्पण केले. त्या ठिकाणी त्याच्यातील गुणवत्ता बघून त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या कारकिर्दीत नॅथन लायनने मागे वळून पाहिले नाही.
100 कसोटी सामने खेळताना नॅथन लायनने प्रतिक्रिया दिली
क्रिकेट. डॉट. कॉम. एयू. सोबत बोलताना नॅथन लायन म्हणाला, “जेव्हा मी ऑस्ट्रेलिया संघासाठी 100 कसोटी सामने खेळलेल्या 12 खेळाडूंची यादी बघतो, तेव्हा समजते की ते किती महान खेळाडू राहिले आहेत. ते फक्त ऑस्ट्रेलिया संघाचे नाही, तर पूर्ण जगाचे दिग्गज खेळाडू आहेत. मी स्वतःला प्रत्येक दिवशी सांगेन की, त्या बारा खेळाडूंच्या यादीत आता माझ्या नावाचा समावेश आहे. हा खूप चांगला अनुभव आहे. ”
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर 87 षटकांत 5 गडी गमावून 274 धावा धावा केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो या सामन्यात फक्त 1(4) धावेवर बाद झाला. मार्क्स हॅरिस 5(23)धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात जरी खराब झाली असली तरी मार्नस लॅब्यूशानेने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी करून ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सावरला.
महत्त्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील १८ वे शतक करत जो रुटने केला मोठा रेकॉर्ड, ‘या’ दिग्गजांच्या यादीत झाला सामील
रोहित शर्माला गोलंदाजी करताना पाहून दिनेश कार्तिकने ‘या’ दोन गोलंदाजाना दिली चेतावणी
‘त्याला’ ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघात स्थान न दिल्याने माजी दिग्गजाने फटकारले