भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून (7जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. भारताने या सामन्यात दोन बदल केले असून रोहित शर्मा व नवदीप सैनीचा मयंक अग्रवाल व उमेश यादवच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे.
यावेळी नवदीप सैनीने आपले कसोटी पदार्पण केले असून त्याला जसप्रीत बुमराह कडून आपली कसोटी कॅप मिळाली आहे. नाणेफेकाच्या काही वेळ अगोदरच भारतीय संघाच्या सर्व सदस्यांसमोर जसप्रीत बुमराहने सैनीला कसोटी कॅप दिली. सैनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा 299 वा खेळाडू ठरला आहे.
बुमरहा सैनीला कॅप देताना म्हणाला, ‘ही कॅप मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, आणि तू यासाठी पात्र आहेस.’ सैनीला कॅप देतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Congratulations @navdeepsaini96. He realises his dream of playing Test cricket for #TeamIndia today. A proud holder of 🧢 299 and he receives it from @Jaspritbumrah93. #AUSvIND pic.twitter.com/zxa5LGJEen
— BCCI (@BCCI) January 6, 2021
मागील सामन्यातच शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते ,व यावेळी सैनीला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. सर्व भारतीयांना सैनीकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघामध्येदेखील 2 बदल करण्यात आले असून, अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल पुकोस्कीचा संघात समावेश करण्यात आला आहे. पुकोस्की देखील आपले कसोटी पदार्पण करणार असून सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष दोन्ही संघाच्या युवा खेळाडूंवर असणार आहे.
अशी आहे सैनीची कामगिरी –
सैनीने याआधी भारताकडून 7 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेत 6 आणि टी20 मध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने 46 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 128 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने अ दर्जाच्या 54 सामन्यात 81 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाकडून २२ वर्षीय खेळाडूचे झाले कसोटी पदार्पण, पाहा कशी आहे कामगिरी
IND v AUS : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय; असे आहेत दोन्ही संघ