भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. परंतू आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी दिल्लीच्या नवदिप सैनीची निवड करण्यात आली आहे.
नवदिप सैनीची रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी झाली होती. शमी बंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे.
तसेच भारताचा उदयोन्मुख यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय ‘अ’ संघातून फिटनेसच्या कारणावरून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या ऐवजी भारतीय ‘अ’ संघात ईशान किशनची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने भारत अ संघातील मोहम्मद सिराज आणि रजनीश गुरबानीला भारतीय संघाच्या प्रशिक्षण सत्रात सामील होऊन फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करण्याची विनंती केली आहे.
मागिल काही महिन्यांपासून बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसच्याबाबतीत कठोर निर्णय घेतले आहेत.
याआधीही फिटनेसच्या कारणावरुन युवराज सिंग, सुरेश रैना यांना भारतीय संघातील स्थान गमवावे लागले होते.
14 जून ते 18 जून दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात कसोटी सामना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
–291 कसोटी सामने आणि 33 वर्षांनंतर विंडिज संघाने केला हा कारनामा!
–सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण!
–२१ वर्षीय क्रिकेटपटूचा सरावादरम्यान दुर्दैवी मृत्यु
–तो एक ट्विट रशीद खानला पडला भलताच महाग