पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेदरम्यान पत्रकारांशी बोलताना भारताचा दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेस म्हाणाला की, भारतीय टेनिसमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी राहुल द्रविड व पुल्लेला गोपिचंद यांसारख्या प्रशिक्षकांची गरज आहे. त्यांनी आपापपल्या खेळामध्ये उत्तम खेळाडू घडवीले आहेत.
टाटा ओपन महाराष्ट्रच्या तिसर्या आवृत्तीच्या वेळी बोलताना पेस म्हणाला, “ज्या भारतीयांबद्दल मला प्रचंड आदर आहे अशा काही भूतकाळातील खेळाडूंकडे मी पाहिले तर राहुल द्रविड, पुल्लेला गोपीचंद असे खेळाडू आहेत ज्यांनी तरुण पिढीला सर्वोच्च पातळीचे प्रशिक्षण दिले आहे.
संसाधनाच्या अभावी २००१ मध्ये ऑल इंग्लंड विजेतेपद मिळविणार्या गोपीचंदने सध्या बॅडमिंटनच्या प्रतिभेचे पालनपोषणच केले नाही तर देशासाठी दोन ऑलिम्पिक पदकविजेतेपद मिळवून देणारे खेळाडूही घडवले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहूल द्रविडेही निवृत्तीनंतर क्रिकेटमधील युवा खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले आहे.
आयपीएल, प्रीमियर बॅडमिंटन लीग, अल्टिमेट टेबल टेनिस सारख्या लीगमध्ये स्पर्धा मोठी आहे, अधिक मुलांना आकर्षित करण्यासाठी टेनिसमध्येही खेळ इतर खेळांप्रमाणेच बदल करावे लागतील असे पेस म्हणाला. आयपीएलच नाही तर टेबल टेनिस, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन, कबड्डी या खेळांमध्ये लीग आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. त्यामुळे भारतीय टेनिसमध्ये काही बदल करणे महत्वाचे आहे.
लिअँडर पेसचा तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील हा शेवटचा सहभाग आहे. पेस पुढे म्हणाला आजकाल मुलांना भरकटवणारी अणेक माध्यमे आहेत. त्यासाठी मुलांना चांगल्या गोष्टींकडे आकर्षीत करणे महत्वाचे आहे आणि टेनिस खेळ हा एक उत्तम पर्याय आहे.
दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत भारताच्या रामकुमार रामनाथन , पुरव राजा या जोडीकडून वाईल्डकार्ड प्राप्त जोडी भारताचा लिअँडर पेस व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन यांना 6-2, 6-1 असा एकतर्फी लढतीत पराभव पत्करावा लागला.