---Advertisement---

साधा फोन वापरणाऱ्या आशिष नेहराला ट्रोल करण्याआधी ह्या गोष्टी माहित करून घ्या

---Advertisement---

काल ३८ वर्षीय नेहराची भारतीय टी२० संघात निवड झाली. अनेक चांगली कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांना वगळून या खेळाडूला संधी देण्यात आली. परंतु काही वेळातच बीसीसीआयने मार्च २०१६मध्ये ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या एका विडिओवरून नेहराला ट्रॉल करण्यात येत आहे.

स्मार्टफोन वापरत नाही म्हणून ज्या आशिष नेहराला ट्विटरवर ट्रॉल केलं जात आहे त्याबद्दल ह्या गोष्टी आपणास माहित आहेत का ?

– वयाच्या ३८व्या वर्षीही हा खेळाडू संघात निवड व्हावी म्हणून कठोर मेहनत घेत आहे.

-या वयातही हा खेळाडू ताशी १४० च्या वेगाने गोलंदाजी करतो.

-स्मार्टफोन वापरून आपले भारतीय संघात पुनरागमन होणार नाही तर चांगला सराव करून आणि कामगिरी करून होईल हे या खेळाडूला पक्के ठाऊक आहे.

-भारतीय गोलंदाजांमध्ये टी२० प्रकारात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नेहरा तिसरा आहे. त्याने केवळ २६ सामन्यात २१.४४च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापुढे केवळ आर अश्विन (५२) आणि जसप्रीत बुमराह(२६) हे खेळाडू आहेत.

-वनडेतही या गोलंदाजाने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १०वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे १५५ विकेट्स घेण्यासाठी नेहराने केवळ ११७ वनडे सामने खेळले आहेत जे सर्वात कमी आहेत.

-नेहरा या वयात क्रिकेटमधील छोट्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो. जास्त पुढचा विचार करत नाही. जे कोणत्याही खेळाडूकडून ह्या वयात अपेक्षित असते ते नेहरा करतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment