---Advertisement---

न्यूझीलंडचा टी20 वर्ल्डकपमध्ये अनोखा पराक्रम, पहिले तिन्ही फलंदाज गमावूनही जिंकला सामना

New Zealand Cricket & Trent Boult
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा हंगाम दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सुरूवातीला यजमान संघ धुमाकूळ घालेल असे तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र ज्याप्रकारे झिम्बाब्वे, आयर्लंड संघांनी कामगिरी केली आहे, ती लक्षणीय ठरत आहेत. यामध्ये अनेक खेळाडूंनी नवनवीन विक्रमे आपल्या नावावर केली आहे. संघांनीही त्यांच्या कामगिरीत सुधारणा करत विश्वविक्रम रचले आहेत. त्याच्याच प्रत्यय शनिवारी (29 ऑक्टोबर) आला.

सुपर 12चा सामना ग्रुप एकमधील न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रंगला. हा सामना न्यूझीलंडने 65 धावांनी जिंकला. हा विजय त्यांचा या स्पर्धेतील दुसरा मोठा विजय ठरला. हा विजय मिळवताना त्यांनी आपल्या नावावर एका खास पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा न्यूझीलंड एकमेव संघ ठरला आहे.

काय आहे तो रेकॉर्ड?
पुरूषांच्या टी20 विश्वचषकात पहिले तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर गमावूनसुद्धा त्या संघाने सामने जिंकले आहेत. असे त्यांनी एकदा नाहीतर दोनदा केले आहे. असा केवळ एकच संघ असून तो न्यूझीलंड आहे. न्यूझीलंडने अशी कामगिरी 2016 आणि आज म्हणजे शनिवारी श्रीलंकेविरुद्ध केली आहे.

भारतात 2016मध्ये जेव्हा टी20 विश्वचषक झाला. त्यामध्ये नागपूरमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने आले होते. त्यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 127 धावसंख्या उभारली होती. तेव्हा मार्टिन गप्टिल (6), केन विलियमसन (8) आणि कोलिन मुन्रो (7) हे लवकरच बाद झाले. त्या सामन्यात भारत केवळ 79 धावसंख्येवरच सर्वबाद झाला होता. त्यामुळे न्यूझीलंडने 47 धावांनी जिंकला होता. Teams winning a men’s T20 World Cup match after their top-3 batters were out at single digits

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड
न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा फिन ऍलन (1), डेवॉन कॉनवे (1) आणि कर्णधार केन विलियमसन (8) हे पॉवरप्लेमध्येच बाद झाले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर ग्लेन फिलिप्स याने शतकी खेळी केली. त्याने 64 चेंडूत 104 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 167 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 19.2 षटकात 102 धावसंख्येवरच गारद झाला.

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्याने गतउपविजेता न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या आशा मजबूत झाल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेत तीन पैकी दोन सामने जिंकत 5 गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

पुरूषांच्या टी20 विश्वचषकात पहिले तिन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येवर आऊट होऊनसुद्धा सामना जिंकणारे संघ-
न्यूझीलंड विरुद्ध भारत, 2016 (47 धावांनी विजय)
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, 2022 (65 धावांनी विजय)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त हे काम केल्याने ऑस्ट्रेलियात नेहमी यशस्वी होतो विराट; आकडेवारीही झकास
INDvSA: सामन्याआधी आफ्रिकी खेळाडूची विराटला वॉर्निंग! म्हणाला, ‘तो फॉर्ममध्ये आला असला तरी आमचे गोलंदाज….’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---