कोलंबो। सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी टी २० मालिकेत टीम इंडियासमोर एक मोठेच संकट उभे राहिले आहे. संघातील सदस्यांना गेले काही दिवस सोशल मिडीया वापरता येत नाही.
बौद्ध आणि मुस्लिम समुदायात तणाव वाढल्याने श्रीलंकेतील कॅंडी शहरात १० दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली पहिल्या टी२० सामन्यापुर्वी लावण्यात आली. टीम इंडिया या मालिकेसाठी कोलंबो शहरात आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंका सरकारने सोशल मिडीयावर बंधने घातली आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी सर्वच शहरात करण्यात आली आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे या माध्यामातुन चुकीचे संदेश जावू नये हाच आहे. यात विशेषकरुन श्रीलंकेत अल्पसंख्याक असलेल्या मुस्लीम समाजाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर वाद वाढतील असे संदेश पाठवले जात आहेत.
सोशल मिडीयावर बंधनांमुळे मात्र टीम इंडियाचे चांगलेच हाल झाले आहेत. कारण परदेश दौऱ्यावर असताना खेळाडू आजकाल सोशल माध्यमांद्वारेच नातेवाईक, मित्र यांच्याशी संपर्क साधतात.
याबद्दल बोलताना एका खेळाडूने नाराजगी व्यक्त केली आहे. ” आम्हाला संदेश येत आहेत. परंतु आम्ही त्याला उत्तर देवू शकत नाही. तसेच काही संदेश पाहूही शकत नाही. मला कुणाला फोनही करता येत नाही. ” असे हा खेळाडू म्हणाला.
Notice to Subscribers | විශේෂ නිවේදනයයි | வாடிக்கையாளர்களுக்கான அறிவித்தல் pic.twitter.com/j2TVGP7Yzy
— Dialog Axiata (@dialoglk) March 7, 2018