पुणे | नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 22 जुलै 2018 या दिवशी होणार आहे. स्पर्धेत2000 हुन अधिक स्पर्धकांसह 500 महिला सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना एनआयओचे संचालक आणि पुण्यातील प्रमुख नेत्रतज्ञ डॉ.आदित्य केळकर, एनआयओच्या संचालिका जाई केळकर आणि रन बडिज क्लबचे अरविंद बिजवे व निखिल शहा यांनी सांगितले की, एनआयओ व्हिजन मॅराथॉनचे आयोजन विशेषकरून टाळत्या येण्याजोग्या अंधत्वाविषयी जनजागृतीसाठी करण्यात आले आहे.
आपल्यापैकी अनेक पालक किंवा आपल्या पैकी अनेकजण अशा वयोगटात आहेत की, जेव्हा ग्लाकोमा, मोतीबिंदू किंवा मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतील. यापैकी अनेक व्यक्तींना गेलेली दृष्टी परत येऊ शकत नाही. पण नियमितपणे डोळ्यांची तपासणी केल्यामुळे यातील कायमचा अंधत्वाचा धोका टाळता येतो.
आम्ही एनआयओच्या माध्यमातून टाळता येण्यासारख्या अंधत्वाचे समाजातून निर्मुलन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्यासाठी डोळ्यांची देखरेख व तपासणीचे आयोजन करीत आहोत. त्यादृष्टीने गेलेले अंधत्व पुन्हा मिळवण्यात येणारे अपयश टाळण्यासाठी पहिली पायरी म्हणून आम्ही डोळ्याच्या रूग्णांमध्ये जागृती निर्माण करीत आहोत. तसेच, त्यांना याविषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे डॉ. केळकर म्हणाले.
एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धा यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. युकेमधे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याशिवाय या मॅराथॉनचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या वर्षी शाश्वत शुक्ला या महिला धावपटू 5 कि.मी. अंतर अनवाणी जलदगतीने धावण्याचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
रनबडिज् क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे. यामध्ये यापैकी कुठल्याही शर्यतीत तुम्ही एक साथीदार डोळेबांधून धावू शकता किंवा अर्धे तुम्ही धावायचे आणि अर्धे तुमच्या साथीदाराने धावायचे अशा अनोख्या व नाविन्यपूर्ण संकल्पनेचा यात समावेश आहे.
तसेच, याशिवाय दृष्टिहीनांबरोबरही एक शर्यत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा आनंददायक अनुभव घेता येईल. 10 वर्षावरील व्यक्ती या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. यामध्ये 2 कि.मी चे अंतर पार करायचे आहे. 1 कि.मी अंतरावरू परत फिरत हे अंतर पुर्ण करायचे आहे. यामध्ये सहभागी दोन्ही स्पर्धकांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॅर्डचे ऑफिशिअल प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
22 जुलै 2018 रोजी 8.30 वाजता रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथे स्पर्धेचा फ्लॅग ऑफ होईल. स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ होणार असून औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग असणार आहे. एनआयओ व्हिजन मॅराथॉन मधे नोंदणी केलेल्या सहभागी सदस्यांनाच मोफत प्रवेश करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत पुण्यांतील तसेच, हिंजवडी भागांतील सर्व आयटी कंपन्यांतील स्पर्धक सहभागी होत आहेत. यामध्ये या कंपन्यांतील सगळ्यांना आपाआपले कंपनीचे व्यवस्थापन किती चांगल्या पध्दतीने कार्य करते याचे प्रदर्शन करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ)ला तुम्ही देणगी देऊ शकता.