---Advertisement---

परदेशातील दिग्गज खेळाडू नसणार २०२० आयपीएलचा भाग?

---Advertisement---

आयपीएलच्या 13व्या हंगामावर कोरोना व्हायरसचे संकट गडद होताना दिसत आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 15 एप्रिलपर्यंत राजनैतिक व नोकरीसाठी अशासारख्या काही श्रेणी वगळता सर्व परदेशी व्हिसावर बंदी घालण्यासाठी सरकारने एक नवीन आदेश जारी केला आहे.

कोरोना व्हायरसचा प्राणघातक उद्रेक रोखण्यासाठी सरकारने घातलेल्या व्हिसा निर्बंधामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये 15 एप्रिलपर्यंत कोणताही परदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाही, असे बीसीसीआयच्या एका उच्चस्तरीय सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल होण्याची यावेळी दाट शक्यता आहे.  29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या हंगामामध्ये सरकारच्या नव्या आदेशामुळे  जवळपास 60 परदेशी खेळाडू  15 एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार नाहीत.  अशा पद्धतीने आयपीएल खेळणे हा एक पर्याय शोधला जात आहे परंतु दर्जेदार परदेशी खेळाडूविना जगातील सर्वात प्रसिद्ध टी -20 स्पर्धेत मनोरंजनाची कमतरता भासणार आहे.

“आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू बिझिनेस व्हिसा प्रकारात येतात. सरकारच्या निर्देशानुसार ते 15 एप्रिलपर्यंत येऊ शकत नाहीत,” बीसीसीआयच्या एका सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितले.

“जर आयपीएल पुढे ढकलली गेली तर बहुतेक सर्व विदेशी खेळाडू या एप्रिल-मेनंतर कदाचित उपलब्ध नसतील. इतर सर्व संघांमध्ये द्विपक्षीय सामने आधीच ठरले आहेत. जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत आम्ही रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल खेळवू शकू”, असेही या सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी होणारी रोड सेफ्टी लेजेंड टी -२० चे पुण्यातील सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार असून  पुणे शहरात आत्तापर्यंत आठ कोरोना व्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

याआधीच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे घरचे सामने आयोजित करण्यास नकार दिलेला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---