भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यावर ऑस्ट्रेलियन संघाने पूर्णता पकड बनवली असून सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघावर पराभव टाळण्याची मोठी जबाबदारी असणार आहे . या सर्व परिस्थितीत भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून आर अश्विनने डेव्हिड वॉर्नरला बाद करत, एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
अश्विनने सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात वॉर्नरला 13 धावांवर बाद केले. त्यामुळे अश्विन कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने तब्बल 193 वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे.
अश्विननंतर या यादीत अनुक्रमे मुथय्या मुरलीधरन व जेम्स अँडरसन यांचा क्रमांक येतो. मुरलीने 191 तर अँडरसनने 184 वेळा फलंदाजांना बाद केले आहे. या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर 172 बळींसह शेन वॉर्न व ग्लेन मॅग्रा यांचा क्रमांक येतो.
अश्विनची कसोटी कारकिर्द –
अश्विनने आत्तापर्यंत 74 कसोटी सामन्यात 25.42 च्या सरासरीने 376 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 193 विकेट्स त्याने डावखुऱ्या फलंदाजांच्या घेतल्या आहेत.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत –
दरम्यान सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव 244 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 94 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 29 षटकांत 2 बाद 103 धावांवर आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आँखों आँखों में ! जडेजा-हेजलवूडचा नजर रोखून पाहण्याचा फोटो व्हायरल, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
खरं की काय? रिषभ पंतने ‘या’ रेकाॅर्डमध्ये सर विवियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकलंय; वाचा पराक्रम
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही