मॉस्को। 2026च्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद युनाईटेड स्टेट, मेक्सिको आणि कॅनडाला मिळाले आहे.
याआधी उत्तर अमेरिकेला 1994 म्हणजेच 15व्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळाले होते. 2016च्या विश्वचषकात फिफाला 11बिलीयन यूएस डॉलरचा फायदा होईल असे वचन उत्तर अमेरिकेने दिले आहे.
उत्तर अमेरिकेबरोबरच मोरक्कोही या यजमानपदाच्या स्पर्धेत होता. मात्र 134-65 मतांनी ते पराभूत झाले. तीन देश फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार हे पहिल्यांदाच घडले आहे. पण जास्त सामने युनाईटेड स्टेटमध्येच होणार आहे.
80 सामन्यांपैकी 10 कॅनडा, 10 मेक्सिको आणि 60 सामने युनाईटेड स्टेट मध्ये खेळले जाणार आहे. अंतिम सामना न्यु जर्सीतील मेट लाईफ स्टेडियमवर होणार आहे.
A historic day for North America.
The 2026 @FIFAWorldCup will be coming to Canada, Mexico and the United States! pic.twitter.com/ToXHDWQCS4
— Major League Soccer (@MLS) June 13, 2018
1994ला उत्तर अमेरिकेने पुरूषांचा फिफा विश्वचषक आयोजित केला होता. तर मेक्सिकोने 1970 आणि 1986 ला फिफाचे यजमानपद भूषविले आहे. तर कॅनडाला पहिल्यादांच यजमानपद मिळाले आहे.
यावर्षीच्या विश्वचषकात यूएसचा संघ नाही. 1986 नंतर प्रथमच यूएसचा संघ विश्वचषकाला मुकला आहे.
तसेच उत्तर अमेरिकेला युरोप, अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेकडून काही मते मिळाली . अमेरिकन फेडरेशनने यासाठी 8 बिलीयन डॉलरचा खर्च केला आहे.
उत्तर अमेरिकेत विश्वचषक परत आणण्यासाठी त्यांचे अध्यक्ष कार्लोस कोरडियरो यांनी मतदारांना फेब्रुवारीतच भेट द्यायला सुरूवात केली होती.
“यूएसने उद्योगाशी निगडीत आहे तर मोरोक्कोने फुटबॉलच्या विकासावर भर देण्याचा प्रस्ताव मांडला होता”, असे मोरोक्कोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
2026च्या फिफा विश्वचषकात 48 संघ सहभाग घेणार आहे. यासाठी उत्तर अमेरिका 23 नविन स्टेडियम तयार करून देणार आहे.