fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ब्रेकिंग- दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह

सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविचची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने काही दिवसांपुर्वीच संपलेल्या एका चॅरीटी स्पर्धेत भाग घेतला होता.

यापुर्वी ग्रिगोर डिमिट्रोव्ह हा मोठा टेनिसपटूही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. “जसे आम्ही बेलग्रेड येथे आलो तेव्हा माझी चाचणी झाली. माझ्या पत्नीप्रमाणेच मी देखील कोरोना बाधीत झालो आहे. माझ्या मुलांना मात्र याची लागणं झाली नाही. पुढील १४ दिवस मी क्वारंटाईन राहणार आहे,” असे जोकोविचने अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

“गेल्या महिन्यात आम्ही जे काही केले आहे ते अतिशय मनापासून केले आहे. आम्ही खेळलेल्या स्पर्धेचा उद्देश चांगला होता. युरोपमधील प्रस्थापित व युवा टेनिसपटूंसाठी ही स्पर्धा आयोजीत केली होती. यामुळे त्यांना स्पर्धात्मक टेनिस खेळता येईल. जेव्हा जगात सगळ्या स्पर्धा स्थगित केल्या आहे तेव्हा याची गरज होती, ” असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You might also like