काल (24 जानेवारी) ऑकलॅंड येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात पहिला टी20 सामना (First T20 Match) पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय (Won by 7 Wickets) मिळविला आहे. तसेच, मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) रिषभ पंतबद्दल (Rishabh Pant) आपले मत व्यक्त केले होते.
या सामन्यापूर्वी भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता यांनी इरफान पठाणला रिषभ पंतबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “केएल राहुल (KL Rahul) आता काही प्रमाणात बदलला आहे. तो आता फक्त एक फलंदाज नसून एक यष्टीरक्षकही आहे.”
या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) झालेल्या वनडे सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रिषभ पंतला डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे त्याचा बदली यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला संधी देण्यात आली होती.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून केएल राहुललाच संधी देण्यात आली होती. त्यामुळे त्याने अर्धशतकी खेळी करत ही निवड सार्थ ठरवली. यामुळे रिषभ पंतचे टी20 संघात परतने तुर्ततरी अवघड वाटते.
भारत-न्यूझीलंडच्या या ५ खेळाडूंनी मिळून टी२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास
वाचा👉https://t.co/l2gtqaMwva👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
त्या ४ खेळाडूंमध्ये मुंबईकर श्रेयस अय्यरचेही नाव झाले सामील
वाचा👉https://t.co/E3rVzyLSUX👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020