हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत चौथा वन-डे सामना उद्या (31 जानेवारी) सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. या 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारतीय संघ 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार आहे. रोहितचा हा 200वा वन-डे सामना असणार आहे. यामुळे तो 200वन-डे खेळणारा भारताचा 14वा तर जगातील 80वा खेळाडू ठरणार आहे.
या सामन्यात रोहितला दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
सलामीवीर म्हणून रोहितला सर्वात जलद 6000 वन-डे धावा करण्यासाठी 168 धावांची गरज आहे. सध्या त्याने सलामीवीर म्हणून 114 डावांमध्ये 5832 धावा केल्या आहेत. या 6000 धावा करण्यासाठी त्याच्याकडे 8 डाव बाकी आहेत.
रोहितच्याआधी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमलाने 123 डावांमध्ये आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने 133 डावांत सलामीला येताना 6000 धावांचा टप्पा गाठला आहे.
आतापर्यंत रोहितने 199 वनडे सामने खेळले असून त्यात 48.14च्या सरासरीने 7799 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–५२ वर्षांत जे घडले नाही ते रोहित सेनेला न्यूझीलंडमध्ये करण्याची संधी
–रोहित करणार असा काही कारनामा की धोनी- विराट पाहातच रहातील
–रिषभ पंत ज्या सामन्यात खेळत होता त्याच सामन्यात झाला मधमाशांचा हल्ला