वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 35 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने न्यूझीलंड समोर 253 धावांचे लक्ष ठेवले होते. यावेळी फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी उत्तमप्रकारे रोखले.
या सामन्यात युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेत मालिकेत 9 विकेट्सचा आकडा गाठला आहे. याचबरोबर त्याने एका वन-डे मालिकेत न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूमध्ये अनिल कुंबळे, पॉल स्ट्राँग आणि शेन वॉर्न यांची बरोबरी केली आहे.
या यादीत 10 विकेट्ससह श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरण पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2000-01 या दरम्यान झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघातील वनडे मालिकेत हा कारनामा केला होता.
न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध एका वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकीपटू-
10 – मुथय्या मुरलीधरण (श्रीलंका, 2000-01)
9 – अनिल कुंबळे (भारत, 1993-94)
9 – पॉल स्ट्रॅंग (झिम्बाब्वे, 1997-98)
9 – शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया, 1999-00)
9 – युजवेंद्र चहल (भारत, 2018-19)
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहली-रोहितच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम
–न्यूझीलंड विरुद्ध एमएस धोनीच्या बाबतीत ९ वर्षांनंतर घडली ती नकोशी गोष्ट
–३६ वर्षानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बाबतीत घडली ही गोष्ट