राष्ट्रकुल स्पर्धेत आज सातव्या दिवशी भारताला शुटींगमध्येही कांस्यपदक मिळवले आहे. ओम मिथरवालने ५० मीटर पिस्तोल प्रकारात हे पदक मिळवून दिले.
ओम मिथरवालने ही कामगिरी करताना २०१.१ गुण घेत ५० मीटर एअर पिस्तोल प्रकारात ही कामगिरी केली आहे. याच प्रकारात भारताच्या जीतू रायला मात्र पदक मिळवण्यात अपयश आले. तो १०५ गुणांसह ८व्या स्थानी राहिला आहे.
याच स्पर्धेत परवा ओमने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्यामूळे त्याचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.
भारताचे आता ११ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्यपदके झाली असून एकूण २२ पदकांसह भारत तिसऱ्या स्थानी कायम आहे.
– २३ वर्षीय ओम मिथरवाल राजस्थानमधील श्रीमाधोपुर गावचा
-४ वर्षापुर्वी तो भारतीय सेनादलमध्ये रुजू झाला
-१ वर्षापुर्वीच ओमने लग्नही केलं आहे