आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने आत्तापर्यंत मोठे विक्रम केलेत. त्यातील त्याचा एक मोठा विक्रम म्हणजे तो कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज होता. हा विक्रम त्याने 17 वर्षांपूर्वी 11 ऑगस्ट 2005 रोजी केला होता. आजही अनेकांना त्याचा 600 वा विकेट आठवतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 600 विकेट्स मिळवणारा गोंलंदाज शेन वाॅर्न आहे. त्याने हा विक्रम इंग्लंडविरूद्ध केला होता.
वाॅर्नच्या 600 व्या विकेटचा बळी इंग्लंडचा सलामी फलंदाज मार्कस ट्रेस्कोथिक ठरला होता. वाॅर्नच्या चेंडूवर मार्कस वेगळ्याच प्रकारे बाद झाला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्या डावात 163 धावसंख्येवर मार्कसच्या रुपात पहिला झटका मिळाला. मार्कस या डावात 63 धावा बनवू शकला होता.
वाॅर्नच्या चेंडूवर मार्कस यष्टीपाठी झेलबाद झाला होता. चेंडू त्याच्या बाॅटला स्पर्श करून यष्टीरक्षक ऍडम गिलक्रिस्टच्या मांडीवर लागला आणि त्याने त्याच्यावर अप्रतिम झेल घेतली. यामुळे वाॅर्नचा 600 व्या कसोटी विकेटला विशेष महत्व प्राप्त झाले. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 444 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स 280 धावा केल्या होत्या.
Bowlin’ Shane 👏
On this day in 2005, @ShaneWarne made history at Old Trafford, becoming the first player to take 600 Test wickets. pic.twitter.com/ZpLGzAxY8u
— ICC (@ICC) August 11, 2021
ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या डावात 302 धावांवर सर्वबाद झाला होता. दुसऱ्या डावात 9 बाद 371 धावा करुन ऑस्टेलियाने सामना अनिर्णीत केला होता. या सामन्यात वाॅर्नने 4 विकेट्स घेतले होते. शेन वाॅर्नच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट्स आहेत. या यादीत मुरलीधरन 800 विकेट्ससह प्रथम क्रमांकावर आहे. सध्या जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 621 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नने क्रिकेटविश्व गाजवल खरं, मात्र पहिल्या सामन्यात शास्त्रींनी केलेली धुलाई तो विसरला नाही
ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार