नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(5 मार्च) दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात सर्वबाद 250 धावाच करता आल्या.
भारताकडून या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. त्याने 120 चेंडूत 116 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. त्याला 48 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सने बाद केले.
विराटचे हे वनडे क्रिकेटमधील 40 वे शतक ठरले आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये 40 शतके करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने 49 वनडे शतके केली आहेत.
विशेष म्हणजे विराटने 40 वे शतक वनडे क्रिकेटमधील 216 व्या डावात केले आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 40 शतके करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. सचिनने 40 वे शतक 355 व्या डावात केले होते. म्हणजेच विराटला वनडेमध्ये 40 शतके करण्यासाठी सचिनपेक्षा तब्बल 139 डाव कमी लागले आहेत.
या सामन्यात विराटने विजय शंकरबरोबर चौथ्या विकेटसाठी 81 धावांची तर जडेजा बरोबर सातव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
–तेंडुलकर, कपिल देव नंतर असा कारनामा करणारा जडेजा तिसराच भारतीय
–तब्बल ९ वर्षांनी एमएस धोनीवर आली अशी वेळ
–नागपुरच्या भूमीवर किंग कोहली ठरला कूल धोनीला सरस