आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफ जवळ येत आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाचा आज सनरायझर्स हैदराबाद संघाशी सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी प्लेऑफमध्ये जाणे खूप अवघड असणार आहे. एका बाजूला पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या स्थानावर आहे. तसेच हैदराबाद 9 व्या स्थानावर आहे. आता चेन्नईचे 6 सामने उरले आहेत. जर चेन्नई हैदराबाद विरुद्ध पराभूत झाली तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का जाणून घ्या संपूर्ण समीकरण.
चेन्नई सुपर किंग्सने आत्तापर्यंत 8 सामन्यांमध्ये फक्त दोन सामन्यात विजय पत्करला आहे. लीग स्टेजमध्ये अजून त्यांचे 6 सामने शिल्लक आहेत जर चेन्नई त्यांचे उरलेले सर्व सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण होतील आणि 16 गुण असलेला संघ कोणत्याही अडचणी शिवाय प्लेऑफ मध्ये पोहोचू शकतो. पण चेन्नई सध्या खराब फॉर्ममध्ये आहे.
चेन्नई संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना उरलेल 6 सामने जिंकावे लागतील. चेन्नई संघाचा नेट रन रेट आता – 1.392 आहे. ज्याची भरपाई करण्यासाठी त्यांना केवळ 6 सामने जिंकावेच लागतील ते सुद्धा मोठ्या अंतराने जिंकावे लागतील.
चेन्नईला जर हैदराबादकडून पराभव मिळाला तर ते स्पर्धेमधून बाहेर पडू शकतात आणि जर चेन्नईने त्यांचे बाकीचे 5 सामने जिंकले तर त्यांना दुसऱ्या संघावरती प्लेऑफमध्ये जाण्यासाठी निर्भर रहावे लागेल. हैदराबाद संघाची अवस्था सुद्धा चांगली नाही. चेन्नईकडून जर त्यांनी पराभव पत्करला, तर त्यांना सुद्धा प्लेऑफमध्ये जाणे अत्यंत कठीण होईल. स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास, जो संघ आज पराभूत होईल तो प्लेऑफ मधून बाहेर जाण्याच्याच मार्गावर आहे.