इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ५८ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीच्या भेदक माऱ्यासमोर संपुर्ण इंग्लंड संघाने सपशेल शरणागती पत्करली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत ट्रेंट बोल्टने १०.४ षटकांत ३२ धावा देत ६ तर टीम साऊदीने १० षटकांत २५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे या सामन्यात न्यूझीलंडने फक्त या दोनच गोलंदाजांचा वापर केला.
इंग्लंडकडून मार्क स्टोनमॅनने ११ तर क्रेग ओवरटनने ३३ धावा केल्या. ह्या दोनच खेळाडूंना दुहेरी धावसंख्या उभारता आली.
-१९९४ नंतर प्रथमच केवळ दोन गोलंदाजांनी गोलंदाजी करत समोरच्या संघाला सर्वबाद केले आहे.
-पहिले सत्र संपायच्या आधी कसोटीत संघ बाद होण्याची ही ५वी वेळ तर इंग्लंडवर पहिल्यांदाच अशी वेळ
-१०व्या विकेटमध्ये आजच्या सामन्यात ३३ धावांची भागीदारी झाली. केवळ ५व्यांदा बाकी ९ विकेट्य मिळून केलेल्या भागीदारीपेक्षा १०व्या विकेटची भागीदारी जास्त आहे.
58 ALL OUT!
Six for Boult, four for Southee, and England have rolled over for their sixth-lowest total ever.
LIVE: Follow the updates from the historic pink-ball Test at Eden Park.
️ #NZvENG ➡️https://t.co/FDVkYrjU8k pic.twitter.com/OKY1jB6Pzo— ICC (@ICC) March 22, 2018