रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(8 मार्च) तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 313 धावा केल्या आहेत आणि भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 314 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि अंबाती रायडूची विकेट्स लवकर गमावल्या. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 27 धावा अशी झाली.
या सामन्यात रोहित शर्माच्या विकेटची बरीच चर्चा झाली. त्याला पॅट कमिन्सने पाचव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पायचीत केले. पण यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विकेटसाठी अपील केले तेव्हा पंचांनी नाबाद दिले होते. परंतू त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.
कमिन्सने टाकलेला तो चेंडू आधी पॅडला लागला की आणि बॅटला लागला असा प्रश्न होता. पण डीआरएस रिव्ह्यूमध्ये चेंडू आधी पॅडला लागल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलून रोहितला बाद द्यावे लागले.
मात्र रोहितने यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी व्यक्त करतच तो मैदानातून ड्रेसिंगरुममध्ये परतला. त्याने 14 चेंडूत 14 धावा केल्या. तसेच या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला.
https://twitter.com/shaktikapoor143/status/1103999541492305920
महत्त्वाच्या बातम्या –
–गेल्या ५ सामन्यातील भारतीय सलामीवीरांची कामगिरी पहाच
–१४ धावांवर बाद होऊनही हिटमॅन रोहित शर्माने केला हा मोठा कारनामा
–गेल्या दोन वर्षांत ४६३ गोलंदाजांना जे जमलं नाही ते कुलदीपने करुन दाखवलं
–धोनी हैं तो मुमकिन हैं, पहा धोनीने केलेला अफलातून रनआऊट
–तर विश्वचषक २०१९नंतरही धोनी खेळू शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट