कोलंबो, श्रीलंका । येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला शिखर धवनच्या रूपाने पहिला झटका बसला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून मालिकेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानावर उतरले पण दुसऱ्याच षटकात विश्वा फर्नांडोने त्याला तंबूत परत पाठवले.
धवन फर्नांडोच्या गोलंदाजीवर हवेत फटका मारण्याच्या प्रयत्नात थर्ड मॅनकडे झेल देऊन बाद झाला. धवनने या मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक केले आहे त्यामुळे तो फॉर्ममध्ये दिसत होता. पण अतिआत्मविश्वासामुळे त्याने बिना फूटवर्क फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद झाला.
आता खेळपट्टीवर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा खेळत आहेत. संघाची धावसंख्या ५ षटकानंतर १ बाद २८ अशी आहे.