सोमवारी (१८ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि वेस्टइंडीज यांच्यात टी२० विश्वचषका २०२१ स्पर्धेसाठी पहिला सराव सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. बाबर आजमच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवला आहे.
या सामन्यात वेस्टइंडिजचा संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. वेस्टइंडीजने सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात सात विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १३० धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज पाकिस्तानी वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसमोर अधिक काळ टिकाव धरु शकला नाही. परिणामी वेस्टइंडीजला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
वेस्टइंडीजने दिलेले आव्हान गाठण्यासाठी पाकिस्तानला कसलीही अडचण आली नाही. कर्णधार बाबर आजमने ४१ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा पूर्ण केल्या. फखर जमानने २४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ४६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात १५.३ षटकांमध्ये विजय मिळवला.
पाकिस्तानने फलंदाजी करताना मोहम्मद रिझवानची विकेट पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात गमावली होती. असे असले तरी त्याच्यानंतर बाबर आजम आणि जमानने दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची महत्त्वाची भागीदारी पार पडली.
वेस्टइंडीजचा फिरकी गोलंदाज हेडन वॉल्सने बाबर आणि मोहम्मद हफिज या पाकिस्तानचे दोन महत्त्वाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ टाकलेला चेंडूवर बाद केले. तरीदेखील जमानने शोएब मलिकसोबत मिळून पाकिस्तान संघाला लक्ष्यापर्यंत पोहचवले आणि सामन्यात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी वेस्टइंडीज संघाने त्यांचे विकेट्स नियमित अंतरावर गमावले होते, परिणामी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लेंडल सिमन्स (२३ चेंडूत १८) आणि ख्रिस गेल (३० चेंडूत २०) यांनी सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी केली होती. मात्र, नंतर याच कारणास्तव त्यांच्यावर दबाव वाढला आणि त्यांनी त्यांचे विकेट गमावले. शिमरोन हेटमयारने २४ चेंडूत २८ धावा केल्या. कर्णधार कायरन पोलार्ड डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने १० चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या होत्या.
पाकिस्तान संघासाठी वेगवान गोलंदाज हसन अली, हरीस रऊफ आणि शाहीन शाह आफ्रीदी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच फिरकी गोलंदाज इमाद वासिमने तीन षटकांमध्ये ६ धावा दिल्या आणि एक विकेट मिळवली. पाकिस्तान त्यांचा पुढचा सराव सामना बुधवारी(२० ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळणार आहे.
पाकिस्तान टी२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला करणार आहे. या दिवशी पाकिस्तान भारतीय संघासोबत भिडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘दोन दिग्गज, एक संस्मरणीय क्षण!’, बीसीसीआयने शेअर केलेले धोनी-गेलचे फोटो तुफान व्हायरल
अखेरपर्यंत रंगला ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सराव सामना; कांगारूंचा नाट्यमय विजय