बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने रविवारी (२४ ऑक्टोबर) इतिहासात पहिल्यांदाच भारताला विश्वचषकातील सामन्यात पराभूत केले. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये १२ वेळा विश्वचषक आमनासामना झाला होता आणि यापैकी एकदाही पाकिस्तानला विजय मिळवला आला नव्हता. यामध्ये पाच वेळा टी-२० विश्वचषकात आणि सात वेळा एकदिवसीय विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. मात्र, रविवारच्या टी-२० विश्वचषकातील सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने इतिहास रचला आहे.
सामना संपल्यानंतर कर्णधार बाबर आजमने या सामन्यात मिळालेल्या विजयामागचे कारण सांगितले आहे. या सामन्यात बाबरनेही कर्णधाराची जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्याने या सामन्यात ५२ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
विजयानंतर तो म्हणाला की, “आम्ही आमच्या रणनीती अंमलात आणली. शाहीन अफ्रिदीने ज्याप्रकारे सुरुवात केली, त्यामुळे आमचे मनोबल वाढले. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे सांभाळली आणि शेवटच्या षटकांमध्ये आमच्या गोलंदाजांनी त्यांना मोकळेपणाने खेळू दिले नाही.’
‘दवांच्या प्रभावानंतर चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येत होता. आम्ही चांगली तयारी केली होती आणि आमच्या प्रत्येक खेळाडूने त्यांचे १०० टक्के योगदान दिले. पण, आता स्पर्धेची सुरुवात आहे आणि आम्हाला पुढच्या सामन्यालाही गांभीर्याने घ्यावे लागणार आहे.”
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने या सामन्यात भारताचे तीन महत्वाचे विकेट्स घेतले आणि यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. त्याच्या मते, सुरुवातीपासून विकेट घेतल्यामुळे संघ सामन्यात वर्चस्व निर्माण करू शकला.
तो म्हणाला की, “ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आम्ही भारताला हरवले आणि आम्हाला यावर अभिमान आहे. मला माहीत होते की, जर आम्ही सुरुवातीपासून विकेट्स घेतल्या, तर हे आमच्यासाठी चांगले होईल. माझा प्रयत्न जास्तीत जास्त स्विंग मिळवण्याचा होता. नवीन चेंडूसोबत खेळणे कठीण होते, त्यासाठी बाबर आणि रिजवानला श्रेय जाते.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंचा ‘त्या’ अभिमानास्पद मोहिमेस गुडघ्यावर बसत पाठिंबा, पण पाकिस्तानी खेळाडूंनी मात्र…
पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, भारताचा ‘हा’ स्टार क्रिकेटर रुग्णालयात भरती; संघाची वाढली चिंता