सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौर्यावर आला आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात 26 जानेवारी पासून 2 सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर या दोन्ही संघात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दोन मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल14 वर्षानंतर पाकिस्तान दौर्यावर आला आहे. त्यामुळे याबद्दल प्रतिक्रिया देताना मिसबाह उल हक म्हणाला आहे की, त्यांच्या संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध असलेली कामगिरी सुधारणेची संधी असेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पाकिस्तान दौऱ्यासाठी तब्बल 14 वर्षानंतर आला आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल बोलताना मिसबाह उल हकने प्रतिक्रीया दिली आहे. पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक मिसबाह उल हक म्हणाला, “दक्षिण आफ्रिका हा संघ आमच्यासाठी नेहमीच अवघड प्रतिस्पर्धी राहिला आहे. परंतू या वेळेस पाकिस्तान देशांतर्गत परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल.” दक्षिण आफ्रिका संघ 14 वर्षांनी पाकिस्तान दौर्यावर आला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात कसोटी आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या दौर्याला कसोटी मालिकेने 26 जानेवारी पासून सुरू होईल.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार. या मालिकेतील पहिला सामना 26 जानेवारी पासून कराची खेळला जाईल. त्यानंतरच दुसरा कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळला जाईल. दुसर्या कसोटी सामन्याला 4 फेब्रुवारी पासून सुरुवात होईल. त्यांनंतर या दौऱ्यातील टी-20 मालिकेला 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल. हे तीन ही सामने लाहोर येथे खेळले जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाने 20 खेळाडूंचा संघ निवडला आहे. यामध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत असणाऱ्या 8 खेळाडूंना पाकिस्तान संघातून डच्चू देण्यात आला आहे.. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी 9 नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
पाकिस्तान संघाच्या दौर्यावर येतांना दक्षिण आफ्रिका संघाने आपला 21 सदस्यांचा ताफा आणला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व क्विंटन डी कॉककडे आहे आहे.
महत्वाच्या बातम्या:
ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या या दोन चुका
रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर अशा आल्या प्रतिक्रिया