पाकिस्तान क्रिकेटचे जबदस्त फॅन असलेलं चाचा शिकागो हे तेवढेच मोठे महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स आहेत. पाकिस्तान संघाच्या गेले तीन चार वर्ष सुरु असलेल्या घसरणीला कंटाळून हेच चाचा शिकागो आता भारतीय संघाचे चाहते झाले आहेत.
भारत पाकिस्तान बर्मिंगहॅम येथे या वेळी गेल्या ६ वर्षात पह्लीयांदाच चाचा शिकागो उपस्थित राहणार नाहीत. ते म्हणतात “भारत-पाकिस्तान हा मुकाबला आता पहिल्यासारखा राहिला नाही. भारत फार पुढे निघून गेला आहे. ”
कराची येथे जन्म झालेले मोहम्मद बशीर हे क्रिकेट जगतात चाचा शिकागो म्हणूनच प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्ष सुरु असलेली पाकिस्तान क्रिकेटची घसरण त्यांना दुःखी करते.
बशीर हे क्रिकेटप्रेमींसाठी काही नवीन चेहरा नाही. गेली कित्येक वर्ष ते भारत पाकिस्तान सामन्यांना आवर्जून उपस्थित राहतात. बशीर यांच्याबरोबर भारतीय झेंडा घेऊन सचिनचा जगातील सर्वात मोठा फॅन असणाऱ्या सुधीर गौतमलाही आपण खूप वेळा पहिले आहे.
बशीर म्हणतात, ” मी भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या २०११ च्या मोहाली सामन्यापासून या दोन संघात खेळले गेलेले सर्व सामने पहिले आहेत. मला बर्मिंगहॅमला यायलाही आवडले असते परंतु ह्याच महिन्यात मी माझ्या परिवाराबरोबर मक्का येथे जाण्याचा कार्यक्रम आधीच आखला होता. आणि हा सामना बरोबर रमजानच्या महिन्यात आल्यामुळे मी तिकडे जाऊ शकत नाही. ”
“मला कालच सुधीर गौतमचा फोन आला होता परंतु मी येऊ शकणार नाही असं मी त्याला कळवलं आहे. भारत पाकिस्तानला पराभूत तर करेलच पण स्पर्धाही जिंकेल. ”
” मी आजही पाकिस्तान संघाचा चाहता आहे परंतु आता मला भारतीय संघ जास्त आवडतो. मला आधी पाकिस्तान जिंकावं असं वाटायचं आता भारताने जिंकावं असं वाटत. भारतीयांनी मला मला २०११ विश्वचषकाच्या वेळी दिलेलं प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. ”
सध्या सौदी अरेबियामध्ये असलेले बशीर भारत-पाकिस्तान सामना टीव्हीवर पाहू शकत नाही. कारण तिकडे फ़ुटबाँलसोडून बाकी काही जास्त पाहिलं जात नाही. याबद्दल बोलताना बशीर म्हणतात, ” इकडे सगळीकडे फुटबॉल पहिला जातो. मी इंटरनेटवर भारत पाकिस्तान सामना पाहिलं. मला भारत विरुद्ध न्यूजीलँड हा सामनाही पाहायचा होता. ”
एका बाजूला धोनी, कोहली, युवराज आहे तर पाकिस्तान संघात कुणी मोठा खेळाडूसुद्धा नाही. एकेकाळी पाकिस्तानी संघात जावेद मियांदाद, वासिम अक्रम, वकार युनूस सारखे दिग्गज होते. आता त्याच संघातील कित्येक खेळाडूंची नावही मला माहित नाही. ” दोन्ही संघाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना बशीर हे भाष्य करतात.