---Advertisement---

४१ वर्षीय शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर साखरपुडा

---Advertisement---

मागील बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लग्नबंधनात अडकणार असल्याची अफवा पसरली होती. परंतु आता या अफवांवर पूर्णविराम लावत तो खरोखरच साखरपुडा करणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. त्याची होणारी जिवनसंगिनी अजून कोण नसून ती पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची मुलगी असल्याचे समजत आहे. शाहिनच्या कुटुंबीयांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. परंतु साखरपुडा नक्की कोणत्या दिवशी होईल? हे अद्याप ठरलेले नाही.

पाकिस्तानी माध्यामांतील वृत्तांनुसार, शनिवारी (०६ मार्च) शाहिनचे वडील अयाज खान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी शाहिदच्या घरी प्रस्ताव पाठवला होता, जो त्यांनी स्विकार केला आहे. ४१ वर्षीय शाहिदची मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी हिच्यासोबत शाहीनचा साखरपुडा होणार आहे. मात्र अक्सा सध्या तिचे शिक्षण पूर्ण करत असल्याने येत्या २ वर्षात त्यांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच पाकिस्तानी पत्रकार इहतिशम उल हक यानेही ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘दोन्ही कुटुंबांच्या परवानगीनंतर मी सर्वांना सांगू इच्छितो की, खरोखरच शाहीन आणि अक्सा यांचा साखरपुडा होणार आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी संमती दिली आहे. अक्साचे शिक्षण २ वर्षात पूर्ण होईल. यादरम्यान त्यांचा साखरपुडा केला जाऊ शकतो,’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

https://twitter.com/iihtishamm/status/1368237720452161536?s=20

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या २० वर्षांचा असून तो पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २२ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५ विकेट्स चटाकवल्या आहेत. तर २१ टी२० सामन्यात २४ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात ४८ विकेट्सची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---