---Advertisement---

बाबरची तुलना कोहलीशी करणं माजी खेळाडूला पडलं महागात! चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल

babar Azam Virat Kohli
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) नवीन निवड समितीने काम हाती घेताच आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. वास्तविक, पीसीबीच्या नवीन निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. पण पाकिस्तान संघाचा  स्टार खेळाडू बाबर आझमला (Babar Azam) पाकिस्तान संघातून वगळण्यात आले आहे.

बाबर आझमला (Babar Azam) कसोटी संघातून वगळल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चाहते त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. या यादीत बाबरचा सहकारी आणि पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज ‘फखर झमान’चेही (Fakhar Zaman) नाव आहे. फखर झमानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बाबरच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. मात्र, या पोस्टमध्ये फखरने चूक केली. त्याने एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये बाबरची तुलना विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फाॅर्मशी केली. फखरने हे केल्यामुळे क्रिकेटचे चाहते संतापले. त्यांनी सोशल मीडियावर फखरला प्रचंड ट्रोल केले.

फखर झमानने (Fakhar Zaman) सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “विराट कोहली देखील 2020 ते 2023 दरम्यान खराब फॉर्ममधून जात होता, त्यावेळी भारताने कोहलीला कधीही बेंचवर बसवले नाही. त्यावेळी कोहलीची फलंदाजी सरासरी 19.33, 28.21 आणि 26.50 अशी होती. आपल्या प्रमुख खेळाडूंना कमी लेखण्याऐवजी आपण त्यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ – शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद महमूद

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ; कसोटी मालिकेत किवी फलंदाजाने घातला होता धुमाकूळ! 68 वर्षापासून रेकाॅर्ड कायम
24 वर्षीय फिरकीपटूनं रचला इतिहास! बुमराह-कुलदीप-हार्दिक सर्वांना टाकलं मागे
मुंबई इंडियन्सनं बाउचरला हटवलं! या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---