---Advertisement---

पाकिस्तानने IPL 2024 पूर्वी वाढवले भारताचे टेंशन, अनेक दिग्गज खेळाडू आयपीएल सोडून जाऊ शकतात माघारी

---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल 2024ची सुरुवात होईल. पण त्याआधी पाकिस्तान संघाच्या एका निर्णयाने बीसीसीआयचा ताण वाढवला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असा निर्णय घेतला ज्यामुळे भारताचे मोठे नुकसान होऊ शकते.

आयपीएलच्या 17 व्या हंगामात या निर्णयानंतर  सहभागी झालेले अनेक परदेशी खेळाडू आयपीएल सोडून परत जाऊ शकतात. यामुळे जवळपास सर्वच आयपीएल संघांचे टेन्शन वाढणार आहे. तसेच फ्रँचायझींना आयपीएलमध्ये त्यांचे विस्फोटक खेळाडू गमवावे लागू शकतात. याबरोबरच पाकिस्तानचा एकही खेळाडू आयपीएल खेळू शकत नाही. यामुळे  त्यांनी आयपीएलमध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही मालिका फक्त आयपीएल दरम्यान खेळवली जाणार आहे. तर ही  टी-20 मालिका 18 एप्रिलपासून सुरू होत आहे. या कालावधीत आयपीएल 2024 भारतात देखील सुरू होणार आहे. तसेच आयपीएलमध्ये न्यूझीलंडचेही अनेक विस्फोटक खेळाडू सहभागी होतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध मालिका सुरू झाल्यानंतर न्यूझीलंडचे अनेक दिग्गज खेळाडू आयपीएल सोडून टी-20 मालिका खेळण्यासाठी परत जाऊ शकतात.

दरम्यान अशा परिस्थितीत न्यूझीलंडही पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी आपल्या खेळाडूंना परत बोलावू शकते. असे झाल्यास सर्व संघांना मोठा धक्का बसू शकतो. अशातच आयपीएलच्या 17 व्या हंगामात न्यूझीलंडचे एकूण 14 खेळाडू आहेत, ज्यांना फ्रँचायझींनी आयपीएलसाठी समाविष्ट केले आहे. या खेळाडूंमध्ये कॉलिन मुनरो, लॉकी फर्ग्युसन, टिम साऊथी आणि रचिन रवींद्र यांसारख्या अनेक स्टार्सचा समावेश आहे. अशा परिस्थितीत ज्या खेळाडूंची नावे संघात असतील त्यांना आयपीएल सोडून परत जावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---