---Advertisement---

पाकिस्तान नाही झेलू शकणार..’ सौरव गांगुलींचं IPL 2025 बाबत मोठं विधान

Ind vs Pak
---Advertisement---

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणाने आयपीएल शिवाय पाकिस्तान सुपर लीगसुद्धा स्थगित करण्यात आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांचं म्हणणं आहे की, आयपीएल लवकरच सुरू होईल याशिवाय त्यांनी पाकिस्तान विषयी सुद्धा मोठे वक्तव्य केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान जास्त दिवस हा दबाव झेलू शकणार नाही.

आयपीएल 2025 ला स्थगित केल्यानंतर सौरव गांगुली यांनी म्हटले की, देशात युद्धाची परिस्थिती आहे आणि बीसीसीआयला असे करावे लागले, कारण यामध्ये सर्व भारतीय आणि विदेशी खेळाडू आहेत. तरीही आयपीएल लवकरच सुरू होईल. कारण स्पर्धेचं महत्त्वाचं चरण जवळ आलं आहे. असे करावेच लागले असते कारण, खास करून धर्मशाळा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, जयपुर हे सर्व आयपीएलची ठिकाणे आहेत. मागच्या रात्री जी परिस्थिती निर्माण झाली, त्यानुसार हे करणे गरजेचे होते. हळूहळू परिस्थिती निवळेल आणि बाकीचे उरलेले सामने सुद्धा खेळले जातील.

8 मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या काही शहरात हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान धर्मशाळामधील पंजाब आणि दिल्लीचा सामना रद्द करण्यात आला. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजय शर्माने या विषयावर म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाच्या कारणाने सर्वांच्या सुरक्षेमुळे सामना मधेच रद्द केला गेला. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम स्टाफला या गोष्टीची आधीच कल्पना होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---