---Advertisement---

हसन अलीने व्हिडिओ कॉलद्वारे पहिल्यांदाच पाहिलं आपल्या नवजात लेकीला, पाहा बाप-लेकीचा नजरेत भरवणारा क्षण

---Advertisement---

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली बाप बनला आहे. त्याची पत्नी सामीया अर्जू हिने एका मुलीला जन्म दिला आहे. पण हसन अली त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळेला पत्नीजवळ उपस्थित राहू शकला नव्हता, कारण तो पाकिस्तान संघाकडून क्रिकेट सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेला आहे. पण मोबाईलच्या माध्यमातून त्याने आपल्या मुलीला जन्मल्यानंतर पाहिले आहे.

पाकिस्तानी पत्रकार इम्रान सिद्दीकी यांनी अलीकडेच आपल्या मुलीला प्रथमच पाहण्यात हसन अली कसा यशस्वी ठरला याचा फोटो शेअर केला आहे. पत्रकाराने तो फोटो शेअर केला आहे, जेथे व्हिडिओ कॉलवर हसन अली आपल्या नवजात मुलीला पाहत आहे. यानंतर पत्रकाराने हसन अलीचे अभिनंदन केले आहे.

हसन अली त्या पाकिस्तानी खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी भारतीय मुलीशी लग्न केले आहे. हसन आणि सामिया यांचे लग्न ऑगस्ट २०१९ ला झाले होते. सामीया हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील राहणारी आहे.

हसनने ट्विटरवरून तो बाप बनणार असल्याची सुखद बातमी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती. सामिया अमिरात एअरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनिअर असून तिचे कुटुंबीय दिल्लीत राहते. हसनने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून लिहिले होते की, ‘अल्लाहदुल्लाह! अल्लाहने आम्हाला मुलीचे आई बाप बनण्याचे नशिब दिले. आमच्या राजकुमारीचे कुटुंबात स्वागत आहे. माझी अशी इच्छा आहे की, या छोट्या परीने मोठे स्वप्न पाहावेत आणि ते मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अमीन, कृपया तुझी कृपादृष्टी आमच्यावर असुदे.’

हसन अली सध्या पाकिस्तान संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. तिथे पाकिस्तानी संघाने तीन एकदिवसीय सामने खेळले आणि आता टी२० मालिका खेळत आहेत. यावेळी खेळताना पाकिस्तान संघाने एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातली होती. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात हसनला संधी मिळाली नव्हती. पण तिसऱ्या सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. भारताविरुद्ध २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर हसन अलीचा हा पहिलाच सामना होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आज जे काही आहे, ते फक्त मुंबई इंडियन्समुळेच,’ केकेआरच्या क्रिकेटपटूचे मन जिंकणारे वक्तव्य

अरे बाबा चेंडू बघून तरी थांबायचं! पाकिस्तानी खेळाडूने ‘असा’ सोडला सोपा झेल, Video पाहून व्हाल लोटपोट

‘मुंबई इंडियन्सची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याचचं बोला,’ मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---