तब्बल १८ शतके करणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला करायची आहे द्रविड अन् लक्ष्मणसोबत फलंदाजी

भारतीय संघाने मागील काही दशकामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजयाचा शिखर गाठला आहे. भारतीय संघाने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने इतिहासामध्ये आपले नाव कोरले आहे. काही नवीन खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने दिग्गज खेळाडूंच्या नजरेत छाप सोडली आहे. एकेकाळी भारतीय संघाकडे विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारखे दिग्गज खेळाडू होते. त्यांच्यानंतरही भारतीय संघात उत्कृष्ट खेळाडूंचे आगमन होत आहे. परंतु या दिग्गजांचा अजूनही कोणाला विसर पडलेला नाही.

जरी हे क्रिकेटपटू निवृत्त झाले असले तरी आजही अनेकांना त्यांच्यासोबत किंवा विरोधात एक तरी सामना खेळण्याची संधी मिळायला हवी होती, असा मलाल राहतो. पाकिस्तानचा फलंदाज अजहर अली याने अशीच काहीशी इच्छा व्यक्त केली आहे.

पाकिस्तानी खेळाडू अजहर अली हा माजी भारतीय खेळाडूंचा चाहता असल्याचे दिसून येते. एका कार्यक्रमादरम्यान अजहर अलीला प्रश्न विचारला होता की, ‘तूला संधी मिळाल्यास कोणत्या भारतीय खेळाडूसोबत कसोटी सामना खेळायचा आहे?’ त्यावर उत्तर देताना अलीने सांगितले की, ‘मला राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत कसोटी सामना खेळायला आवडेल.’

अजहर अलीची कामगिरी
कसोटी कारकिर्दीत १८ शतके करणाऱ्या अजहर अलीने 2021 मध्ये उत्तम प्रदर्शन केले आहे. त्याने 8 कसोटी सामन्यांमध्ये 58.14 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. अजहर अलीने हरारेमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 240 चेंडूमध्ये 126 धावा काढल्या होत्या. त्याने आबिद अलीसोबत 236 धावांची भागिदारी करण्याचा विक्रम रचला होता. पाकिस्तान संघाने एक डाव आणि 147 धावांनी या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता.

अजहर अलीने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2018 मध्ये खेळला होता. 2019 नंतर त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील प्रदर्शन खराब होत गेले. त्यामुळे त्याला एकदिवसीय संघातून बाहेर करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘उत्साही’ ते ‘प्रतिभासंपन्न’! हरमनप्रीत कौरने कोहली, धोनी आणि रोहितचे वर्णन केले ‘या’ शब्दांत

एक असे अंपायर, ज्यांचा जन्मच ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनला बाद देण्यासाठी झाला होता!

ताबडतोड सलामी! भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोच्च सलामी भागीदारी करणाऱ्या ३ जोड्या