ठाणे हम्पी हिरोज विरुद्ध परभणी पांचाला प्राईड यांच्यात महत्वपूर्ण लढत होती. ठाणे संघ पाच विजया सह पहिल्या क्रमांकावर होता. तर परभणी 3 विजयासह पाचव्या स्थानावर होता. दोन्ही संघांनी सामन्याची सुरवात सावध पवित्रा घेत केली.
ठाणे हम्पी हिरोज संघाच्या चिन्मय गुरव ने आक्रमक चढाया करत परभणी संघावर लोन पाडला. तर विग्नेश चौधरीने चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले. मध्यांतराला ठाणे संघाकडे 24-20 अशी आघाडी होती. परभणी कफून पंकज राऊत व प्रसाद रुद्राक्ष यांनी चांगला खेळ केला.
परभणी संघाच्या बचावपटूंनी 6 सुपर टॅकल गुण मिळवत सामन्यात चुरस निर्माण केली. वैभव कांबळे व सिद्धेश्वर गवळी ने प्रत्येकी 2 सुपर टॅकल केले. शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना 32-32 असा सामना सुरू होता त्यानंतर पंकज राऊत व राहुल घांडगे यांनी गुण मिळवत परभणी संघाला 38-34 असा विजय मिळवून दिला. मात्र परभणी संघाला किमान 7 गुणांनी हा सामना जिंकून संपूर्ण 6 गुण मिळवणे आवश्यक होते. परभणी संघाचे नाशिक प्रमाणेच 22 गुण झाले असले तरी त्याचा गुणांचा फरक कमी असल्याने त्याना टॉप 4 मध्ये जागा मिळवता आली नाही. (Parbhani team’s win in head-to-head match still out of top 4)
बेस्ट रेडर- चिन्मय गुरव, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर्स- वैभव कांबळे, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- चिन्मय गुरव, ठाणे हम्पी हिरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाशिक द्वारका डिफेंडर्सचा सलग तिसरा विजय
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघ प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र