सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी (९ जानेवारी) भारताचा सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाला. हा सामना गुरुवारपासून (७ जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरु झाला असून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने शनिवारी पहिल्या सत्राखेर ४ बाद १८० धावा केल्या होत्या.
भारताने शनिवारी तिसऱ्या दिवशी २ बाद ९६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पण चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला रहाणेच्या रुपात तिसरा धक्का बसला. त्याला ५५ व्या षटकात पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. कमिन्सने या षटकातील चौथा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला होता. त्यावर रहाणेने फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थेट स्टम्पला लागला आणि रहाणेला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. रहाणेने ७० चेंडूत २२ धावा केल्या.
Pressure, pressure, pressure! Cummins ends Rahane's resistance! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/LEsF5a70IE
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
रहाणे बाद झाल्यानंतर भारताने हनुमा विहारीचीही विकेट लवकर गमावली. मात्र शनिवारी पहिल्या सत्राखेरपर्यंत रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सांभाळत नाबाद ३८ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी भारताने शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा(२६) आणि शुबमन गिल(५०) या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथने त्यांच्याकडून १३१ धावांची शतकी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तान दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकन संघाची घोषणा; ‘या’ घातक वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन
“दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वापरली ‘ही’ रणनिती”, जडेजाने केला खुलासा
ब्रिस्बेन कसोटी संदर्भात बीसीसीआयच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावसकर, म्हणाले…