आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी (19 फेब्रुवारी) पासून सुरू होईल. शुभारंभ सामन्यात यजमान पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तत्पू्र्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघात ऐतिहासिक बदल केला आहे. पुरुष संघासाठी पहिल्यांदाच महिला व्यवस्थापकाची निवड करण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात घेऊन, पीसीबीने महिला पोलिस अधिकारी हिना मुनावरची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे. मुनावर ही पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाची पहिली महिला संघ व्यवस्थापक आहे. हिना यापूर्वी पाकिस्तान महिला अंडर-19 क्रिकेट संघाची व्यवस्थापक होती.
‘इंडिया टुडे’च्या अहवालानुसार, मुनावरला सुरक्षा बाबींमध्ये चांगला अनुभव आहे. सिव्हिल सुपीरियर सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून मुनव्वरने दलात वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. तिने स्वात सारख्या धोकादायक भागात फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीसोबत काम केले आहे. मुनावरला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि पाकिस्तानच्या तिरंगी मालिकेसाठी ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
अहवालानुसार पाकिस्तान संघात, खेळाडू आणि बोर्ड यांच्यात सर्वकाही सुरळीत चालेल याची खात्री करण्याची जबाबदारी मुनावरच्या खांद्यावर असेल. तिला आधीच धोरणात्मक आणि नेतृत्व भूमिकांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. संघात पुरुषांची संख्या जास्त असून फक्त क्रिकेट प्रशिक्षणात सहभागी असलेले लोक आहेत, परंतु पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी महिला व्यवस्थापकाची निवड केली.
2025च्या चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तान संघ- मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
महत्त्वाच्या बातम्या-
निकी प्रसादपासून विराट कोहलीपर्यंत या 7 भारतीय कर्णधारांनी जिंकला अंडर-19 विश्वचषक
IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस; गोलंदाजीचा निर्णय! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राष्ट्रीय विक्रमासह वैष्णव ठाकूरची रूपेरी कामगिरी