---Advertisement---

या देशाचे प्रशिक्षक म्हणतात, भारतीय संघाकडून प्रेरणा घ्या

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 7:50 PM
---Advertisement---

बांगलादेशचा क्रिकेट संघ मागच्या 10 वर्षापासून आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  वनडे आणि टी20 मध्ये बांगलादेश चांगली कामगिरी करत आहे. पण कसोटीमध्ये या संघाची खूप वाईट अवस्था आहे. बांगलादेश खेळाच्या सर्वात कठीण प्रकारात चांगली कामगिरी करण्यात अयश्स्वी ठरला आहे.

बांगलादेशने एकूण 117 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ 13 सामने जिंकले आहे. यातील 4 सामने त्यांनी परदेशात जिंकले आहेत. 88 सामन्यात ते पराभूत झाले आहेत तर 16 सामने अनिर्णित राहिले आहेत.

अशा परिस्थतीत बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगोने खेळाडूंना सांगितले आहे की, तुम्ही कसोटीमध्ये भारताकडून प्रेरणा घ्या. भारत सध्या कसोटी क्रिेकेटमध्ये नंबर एकचा संघ आहे. बांगलादेशचे प्रशिक्षक डोमिंगोचे असे म्हणणे आहे की, भारतीय क्रिकेट ज्या मार्गावर जात आहे त्या मार्गावर बांगलादेश क्रिकेटने जावे.

ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत बांगलादेशचे प्रशिक्षक म्हणाले की त्यांच्या संघाने भारताकडून प्रेरणा घ्यायला हवी. “भारताने आपले क्रिकेट कसे खेळले आणि आपला खेळ मागच्या काही वर्षांत कसा विकसित केला आहे, हे असे आहे जे आम्ही करण्याचा प्रयत्न करू शकतो,” असे डोमिंगो म्हणाले.

तसेच डोमिंगो म्हणाले, आम्ही परिक्षणामध्ये किती मागे आहोत याची अनेक कारणे आहे. आमचा रेकार्ड बऱ्याच काळापर्यत चांगला राहिला नाही. परदेशात कसोटी सामने जिंकणे यापुढे मोठे आव्हान असेल जे यावर्षी आमच्यासाठी प्राधान्य आहे.

बांगलादेशचे पुढील आव्हान पाकिस्तान दौरा असेल, तेथे ते दोन कसोटी सामने, तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---