---Advertisement---

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किती गुण हवेत? कोणते संघ आहेत दावेदार? जाणून घ्या सविस्तर

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धा सध्या खूप रोमांचक पद्धतीने सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स ते पंजाब किंग्स पर्यंत सर्व संघांमध्ये जोरदार सामने पाहायला मिळत आहेत. पण या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक संघांनीच स्पर्धेमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. ज्या संघांनी चांगले प्रदर्शन केले आहेत तेच संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील. पण यासाठी काही ठराविक नियम आहेत, पॉईंट्स सोबत नेट रन रेट सुद्धा गेम चेंजिंग ठरू शकतो.

सध्याची पॉईंट्स टेबल स्थिती बघितल्यास दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स संघ टॉपच्या स्थानावर आहेत. हे संघ प्लेऑफमध्ये जाण्याचे भागीदार आहेत. पण लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजय सर्वांचे गणित बिघाडू शकतो.

दिल्लीने या हंगामामध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, आणि त्यामध्ये 5 विजय मिळवले आहेत. त्यांच्याकडे 10 पॉईंट्स आहे. पंजाब किंग्सने 7 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा 10 पॉईंट्स आहेत. गुजरातने 7 सामने खेळले आहे त्यामधील 4 जिंकले आहे, त्यांच्याकडे 8 पॉईंट्स आहेत. आरसीबीने 7 सामने खेळून 4 जिंकले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा 8 पॉईंट आहेत तसेच लखनऊ संघाकडे सुद्धा 8 पॉईंट्स आहेत, त्यांनी 7 सामने खेळून 4 सामन्यात विजय मिळवलेला आहे.

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठीचे नियम

16 पॉईंट्स किंवा 8 विजय मिळवणारा संघ नेहमीच प्लेऑफ मध्ये पोहोचतो.
14 पॉईंट्स असतील तर 7 सामन्यात विजय मिळवून देखील क्वालिफाय करणे शक्य आहे, पण या परिस्थितीत नेट सुद्धा महत्त्वाचा असतो.

जर नेट रन रेट मजबूत असेल तर 14 पॉईंट्सच्या आधारावर सुद्धा क्वालिफाय केले जाऊ शकते.

12 पॉईंट्स असताना क्वालिफिकेशन करणे अवघड आहे, पण यावर दुसऱ्या संघाचे रिझल्ट आणि चांगले नेट रन रेटची आवश्यकता असते.

प्लेऑफ स्ट्रक्चर

टॉप दोन संघ क्वालिफायर 1 (20 मे) हैदराबादमध्ये खेळतील. येथे जिंकणारा संघ डायरेक्ट अंतिम सामन्यात पोहोचेल.
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ एलिमिनेटर (21 मे) रोजी हैदराबादमध्ये खेळतील.

क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ आणि एलिमिनेटर विजयी संघ क्वालिफायर 2 (23 मे) रोजी कोलकातामध्ये खेळतील.

अंतिम सामना (25 मे) रोजी कोलकाता ईडन गार्डन्स वर खेळायला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---