आयपीएल २०१८ चा हंगाम सुरु झाला आहे. या मोसमाची सुरवातच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमधील सामन्याने झाली.
प्रेक्षकांनीही या अटीतटीच्या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला. त्याचबरोबर या सामन्यात एक खास गोष्ट पाहायला ती म्हणजे विंडीज संघातील सहकारी किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्रावो या दोघांनीही ४०० क्रमांकाची जर्सी घातली होती.
पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो तर ब्रावो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. या दोघांनीही ४०० क्रमांकाची जर्सी का घातली होती याबद्दल पोलार्डने खुलासा केला आहे.
पोलार्ड ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ४०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू बनला आहे तर ब्राव्हो ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या दोघांनीही ही कामगिरी बीबीएल २०१७ मध्ये केली होती. त्यामुळे त्यांनी हे महत्वाचे टप्पे साजरे करण्यासाठी आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ४०० क्रमांकाची जर्सी परिधान केली होती.
याबद्दल पोलार्ड म्हणाला, ” ब्राव्हो ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आणि मी ४०० ट्वेन्टी२० सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे. वयाच्या ३० व्या वर्षीच ४०० सामने मी खेळू शकलो. मला वाटते की या प्रकारात(ट्वेन्टी२०) हा खूप मोठा टप्पा आहे. जेव्हा आम्ही क्रिकेट कारकीर्द सुरु केली तेव्हा आमच्यापैकी कुणीही असा विचार केला नव्हता की आम्ही कितीकाळ खेळू शकतो. याचमुळे आम्ही ४०० क्रमांकाची जर्सी परिधान केली होती.”
या दोघांनीही ट्वेन्टी२० क्रिकेटचे स्पेशालिस्ट मानले जाते. हे दोघेही दोघेही पुढील सामान्यांपासून मात्र त्यांच्या पूर्वीचेच जर्सी क्रमांक घालून खेळणार आहेत. म्हणजेच या पुढे पोलार्ड त्याच्या ४७ आणि ब्रावो ५५ क्रमांकाच्या जर्सीत खेळताना दिसेल.
आयपीएलमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबई संघाला अखेरच्या क्षणी १ विकेट आणि १ चेंडू बाकी ठेवत पराभूत केले. चेन्नईच्या विजयात ब्रावोचे आक्रमक अर्धशतक महत्वाचे ठरले होते. त्यामुळे त्याला या सामन्यात सामानावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता .
पोलार्डने आजपर्यंत ४१४ ट्वेन्टी२० सामन्यात खेळताना ८०४८ धावा आणि २५१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ब्रावोने ३७६ ट्वेन्टी२० सामन्यात खेळताना ४१३ विकेट आणि ५५७१ धावा केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Bg-bHrLFNv_/?hl=en&taken-by=djbravo47
https://www.instagram.com/p/BhMEmfMlHUC/?hl=en&taken-by=djbravo47