---Advertisement---

‘बाऊंड्री लाईनवर उडता कायरन पाहिलात का?’ पोलार्डने घेतलेला अप्रतिम झेल एकदा बघाच

Pollard-Catch
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित आहे की कायरन पोलार्ड एक चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडे बॅटने चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याची ताकद आहे. सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात पोलार्डने त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार अल्झारी जोसेफचा अप्रतिम झेल टिपला. हा झेल इतका अप्रतिम होता की त्याचा व्हिडिओ सध्या चर्चचा विषय ठरत आहे.

या उत्कृष्ट झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने डावाच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा झेल घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सील्सच्या चेंडूवर अल्झारीने लॉग ऑनवर शॉट खेळला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या पोलार्डच्या उडीचे टायमिंग इतके योग्य होते की त्याने एका हाताने शानदार झेल टिपला. उडी मारून तो सीमारेषेच्या आत पडणार होता, पण मनाची हजेरी दाखवत त्याने चेंडू हवेत फेकला आणि मग आत येऊन तो झेल पकडला.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, सेंट लुसिया किंग्जने प्रथम फलंदाजी केली आणि संघाने 20 षटकात 143/9 धावा केल्या. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून रोशॉन प्राइमसने 38 धावा केल्या तर अकील होसेनने चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर टियोन वेबस्टरने 58 धावा केल्या आणि त्रिनबागो नाइट रायडर्सने तीन गडी आणि चार चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग केला. टीम सेफर्टनेही 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सुपर-4मध्ये पोहोचल्यानंतर दुबईच्या बीचवर भारतीय संघाची मस्ती, विराटच्या सिक्स पॅक्सवर चाहते फिदा
केएल राहुलला हटवून ‘या’ खेळाडूंना केले जाऊ शकते उपकर्णधार, टी20 संघातूनही होणार बाहेर?

बांगलादेशला सळो की पळो करणाऱ्या कुसल मेंडिसचा खास ‘ऍक्शन प्लॅन’! स्वत: केलायं खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---