आयपीएल 2021 च्या तयारीला सुरुवात झाली असून प्रत्येक संघ आपापल्या संघातील कमकुवत बाबी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच बातमी समोर येत आहे की दिल्ली कॅपिटल्स संघाने भारताचे माजी क्रिकेट खेळाडू प्रवीण आमरे यांची पुढील 2 मोसमासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
आमरे हे 2014 ते 2019 सालापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये होते. ते स्थानिक खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष देऊन त्यांचा संघात समावेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावयाचे. रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंना दिल्ली कॅपिटल संघात समाविष्ट करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रवीण आमरे हे अजिंक्य रहाणेच्या बालपणीचे प्रशिक्षक म्हणून असल्याचेही सर्वश्रूत आहे.
🚨 UPDATE 🚨
Pravin Amre rejoins Delhi Capitals for the next 2 seasons 🙌🏽
Having previously worked as our Head Talent Scout between 2014-2019, Amre will join our existing coaching staff, as an Assistant Coach 💫Read more: https://t.co/nXSVgeHwak#YehHaiNayiDilli pic.twitter.com/4T1yt8EzPU
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 6, 2021
दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडल्याबद्दल आमरे म्हणाले ,” दिल्ली कॅपिटल्स संघाने मला त्यांच्या सोबत जोडल्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. दिल्ली कॅपिटल्सने या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्याने त्यांच्यासोबत काम करणे उत्सुकतेचे असणार आहे. रिकी पॉंटिंगसोबत काम करणे देखील विषेश असणार आहे “.
आमरे यांनी भारताकडून 11 कसोटी आणि 37 वनडे सामने खेळलेले आहेत. आमरे यांना कोचिंगचा देखील मोठ्या प्रमाणात अनुभव असल्याने दिल्ली संघाला त्यांचा निश्चितच फायदा होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल प्रेमींसाठी खूशखबर! ‘या’ दिवशी होऊ शकतो आयपीएल २०२१ साठी लिलाव
डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यासाठी वसीम जाफरने पंतला दिला ‘हा’ सिक्रेट मेसेज
किवींकडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत; झेलावा लागला २० वर्षातील दुसरा सर्वात मोठा पराभव