गुरुवारी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे झालेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखांच्या मूळ किंमतीत 48 वर्षीय प्रवीण तांबेला संघात सामील केले, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
मात्र तांबेने त्याचा कोलकाता संघात समावेश झाल्यानंतर म्हटले आहे की वाढते वयाचे कोणतीही अडचण नाही. तो युवा खेळाडूप्रमाणे कामगिरी करेल.
हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार तो म्हणाला, ‘मी अजूनही 20 वर्षांचा तरुण आहे अशा मानसिकतेने खेळत आहे लोक बर्याच गोष्टी बोलतात, परंतु मी माझे काम करत राहतो आणि खूप मेहनत करतो,’
‘मला जी भूमिका दिली जाईल ती चांगल्या प्रकारे करण्याचा माझा प्रयत्न असेल. मग ते गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. हे कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी नाही. तर तसे काही असते तर मी इतका काळ खेळू शकलो नसतो. मी कोलकाताकडून खेळण्यास उत्सुक आहे.’
तसेच तांबे म्हणाला, ‘विकत घेण्यापूर्वी केकेआरने माझ्यामध्ये काहीतरी पाहिले असेलच. मी केकेआर संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. मी त्यांच्यासाठी योगदान देऊ इच्छित आहे. जर तुम्हाला पाठिंबा मिळाला असेल तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता.’
विशेष म्हणजे आयपीएल 2014 मध्ये तांबेने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता विरुद्ध हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.
या हॅट्रिकबद्दल बोलताना तांबे म्हणाला, ‘मला तो क्षण आठवतो. आता मी कोलकाताकडून खेळणार आहे. मला याचा अभिमान वाटत आहे. तो एक सामना विजयी क्षण होता. आता केकेआरसाठीही अशी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न आहे.’
तांबेने आतापर्यंत 33 सामने खेळले आहेत, त्यात त्याने 28 विकेट घेतल्या आहेत. त्याला 2013मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती.
3 वर्षे राजस्थानकडून खेळल्यानंतर 2016 मध्ये गुजराज लायन्सने आपल्या संघात घेतले होते. तर 2017 मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने 10 लाखात संघात सामील करुन घेतले. पण त्याला या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
…म्हणून सीएसकेने पीयूष चावलावर लावली ६.७५ कोटींची बोली, प्रशिक्षक फ्लेमिंगने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/aLM8daHCzz👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
'काय पो छे' चित्रपटातील हा बालकलाकार आता खेळणार आयपीएल २०२०मध्ये! https://t.co/ZktWKyg52t#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT
— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019