इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत ‘इम्पॅक्ट प्लेअर‘ हा नवीन नियम वापरला जात आहे. या निर्णयाचा अनेक संघांना फायदा झाला आहे, तर काही संघांना कदाचित हा निर्णय घेऊन पश्चातापही झाला असेल. कारण, ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून संघात घेतलेल्या खेळाडूकडून संघाला मोठी अपेक्षा असते, पण तो जर अपयशी ठरला, तर निर्णय व्यर्थ ठरतो. असेच काहीसे आता दिल्ली कॅपिटल्स संघासोबत घडले आहे.
शनिवारी (दि. 8 एप्रिल) डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामन्यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals vs Delhi Capitals) संघात रंगला. गुवाहाटी येथील या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 199 धावा चोपल्या. तसेच, दिल्लीपुढे 200 धावांचे आव्हान ठेवले.
यावेळी दिल्लीकडून डावाची सुरुवात करण्यासाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेविड वॉर्नर उतरले. विशेष म्हणजे, पृथ्वी राजस्थानच्या डावात मैदानावर नव्हता. फलंदाजी येताच पृथ्वी शॉ इम्पॅक्ट प्लेअर (Prithvi Shaw Impact Player) म्हणून मैदानात उतरला. यावेळी त्याच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा होती. मात्र, राजस्थानकडून पहिले षटक टाकत असलेल्या ट्रेंट बोल्ट याने तिसऱ्याच चेंडूवर पृथ्वीला संजू सॅमसनच्या हातून झेलबाद करत शून्य धावेवर तंबूत पाठवले. त्याने यावेळी 3 चेंडू खेळून एकही धाव काढली नाही. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/IPL/status/1644674172491272192
पृथ्वी शॉचा लाजीरवाणा विक्रम
विशेष म्हणजे, तो बाद होताच त्याच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. पृथ्वी शॉ ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून फलंदाजीला येऊन शून्यावर बाद होणारा पहिलाच फलंदाज ठरला. पृथ्वी बाद होताच, आपला 16वा हंगाम खेळत असलेल्या मनीष पांडे हादेखील बोल्टच्या चौथ्या चेंडूवर गोल्डन डक पद्धतीने बाद झाला. पांडेला एक चेंडू खेळून शून्य धावेवर तंबूत परतावे लागले. (Prithvi Shaw becomes the first Impact Player out for a duck in IPL 2023 read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या ते ऋतुराज, MI vs CSK सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंवर असेल क्रिकेटविश्वाची नजर, पाहा यादी
धक्कादायक! कृणाल पंड्याचे लाईव्ह सामन्यात अश्लील कृत्य, अंपायरच्या प्रायव्हेट पार्टला…