कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021 ला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक स्थगिती मिळाली आहे. स्थगिती मिळण्याअगोदर या आयपीएल हंगामात 29 सामने पार पडले. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा युवा खेळाडू पृथ्वी शॉने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने ३ अर्धशतके झळकावत ३०८ धावा केल्या. दरम्यान, त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात एकाच षटकातील ६ चेंडूंवर ६ चौकार देखील ठोकले. या कारनाम्याबद्दल शॉने प्रतिक्रिया दिली आहे.
शिवम मावीची केली धुलाई
शॉनी केकेआरचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने टाकलेल्या एका षटकात 6 चौकार मारले. त्याने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला, की नॉन स्ट्राइकला उभा असलेला शिखर धवनने त्याला आठवण करून दिली होती की मावीने टाकलेल्या त्या षटकाचा अखेरचा एक चेंडू बाकी आहे. कारण मावीने या षटकाचा पहिलाच चेंडू एक वाईड टाकला होता.
साहवा चेंडू खेळताना ठरवले आता यावरही चौकार मारायचा
शॉनी सांगितले की, ‘मला पाचव्या चेंडूनंतर माहिती झाले की, षटकाचा आणखी एक चेंडू बाकी आहेत. कारण मावीने षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला होता. मी 5 चौकार मारण्याबद्दल विचार केला नव्हता. परंतु सहावा चेंडू खेळण्याअगोदर मी हा विचार केला होता की, आता इथपर्यंत पोहोचलो आहे. मग शेवटच्या चेंडूवर देखील चौकार मारायचा.
मला शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचा नव्हता
शॉनी या सामन्यात 41 चेंडू मध्ये 82 धावा काढल्या. शॉच्या या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सनी केकेआरविरुद्ध 21 चेंडू राखून विजय मिळवला. शॉनी सांगितले की, ‘मला माहिती नव्हते की, मावी मला शेवटचा चेंडू कुठे टाकेल, तरीदेखील मी विचार केला की, या चेंडूला देखील चौकार लगावायचा. परंतु मला याची भीती होती की, जर मी चेंडू जोरात मारला आणि षटकार बसला तर? कारण मी एका षटकात 6 चौकार मारण्याचा विचार केला होता.’
मावी म्हणाला की, जास्त जोरात शॉट मारू नकोस
शॉ म्हणाला की ‘शिवम मावी माझा एक चांगला मित्र आहे. आम्ही दोघांनी 19 वर्षाखालील विश्वचषक सामना सोबत खेळला आहे. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे सामन्याच्या अगोदर मी त्याला म्हटल होतं की जास्त वेगात चेंडू टाकू नकोस तर तो म्हणाला की, जास्त जोरात शॉट मारू नकोस.’
महत्त्वाच्या बातम्या –
शेर कभी बुढ़ा नहीं होता! ३८ वर्षीय हाशिम आमला ‘या’ स्पर्धेत पाडतोय धावांचा पाऊस
इंग्लंड जिंकणार भारताविरुद्धची मालिका, दिग्गजाने केला दावा; दिले ‘हे’ कारण
विराटच्या लाडक्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार ‘या’ दिवसाची प्रतिक्षा