१९ वर्षांखालील भारतीय विश्वचषक संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणाऱ्या, कर्णधार प्रियम गर्गने एमएस धोनीला त्याचा आवडता कर्णधार म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जन्मलेल्या प्रियमने सोशल मीडियावरील हॅलो ऍपवर दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे.
प्रियमला जेव्हा विचारण्यात आले की, “भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि भारताचा माजी कर्णधार धोनी, यांच्यामध्ये तुझा आवडता कर्णधार कोण आहे?” यावर प्रियमने धोनीचे नाव घेतले. असे असले तरी, तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याचा क्रिकेट आदर्श मानतो. Priyam Garg said that ms dhoni is his favourite captain.
याविषयी बोलताना प्रियम म्हणाला, ” प्रत्येक खेळाडूसाठी कोणी ना कोणी त्याचा आदर्श असतो. पण, मला अजून सचिन सरांना भेटण्याची संधी मिळाली नाही. मला त्यांच्यानंतर जर कोण आवडत असेल तर, तो आहे धोनी.”
तसेच, दिग्गज फलंदाज राहुल द्रविडविषयी बोलताना प्रियम म्हणाला की, “शिस्त, खेळण्याची शैली, कठोर परिश्रम, दुसऱ्यांची मदत करण्याची भावना आणि त्यांच्याशी आपला व्यवहार. या सर्व गोष्टांबाबत मी द्रविड सर आणि माझे प्रशिक्षक यांच्याकडून खूप काही शिकलो आहे.”
नोव्हेंबर 2018ला कानपूरमधील गोवाविरुद्धच्या सामन्यातून प्रियमने प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळत 867 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका द्विशतकाचा, 2 शतकांचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
शिवाय, जानेवारी ते फेब्रुवारी २०२०मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात तो भारतीय संघाचा कर्णधार होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
जुन्या आठवणींना उजाळा देणारा गांगुलीने शेअर केला लॉर्ड्सवरील ‘हा’ खास फोटो
लाडक्या लेकीने बनवलेला खास पदार्थ सचिन तेंडुलकरने केला काही सेंकदातच…
जखमी अवस्थेत असतानाही संघहितासाठी मैदानात उतरलेले ५ क्रिकेटपटू