अजय कुमार ठरला विजयाचा शिल्पकार
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात आतापर्यंत एकही सामना न हरलेल्या बेंगाल वॉरियर्सला काल रोहित कुमारच्या बेंगलुरु बुल्सने पराभवाची धूळ चारली. बेंगलुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने काल निराशाजनक कामगिरीत केली. याचा फरक बेंगलुरु बुल्सच्या एकूण कामगिरीवर पडला नाही कारण त्यांचा दुसरा रेडेर म्हणजेच अजय कुमारने काल चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
बेंगाल वॉरियर्ससाठी जंग कुंग ली आणि मणिंदर सिंग दोघांनीही पहिल्या सत्रात संघासाठी रेडींगमध्ये गुण मिळवले पण त्याना दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सत्रात दोनीही संघांमध्ये जास्त फरक नव्हता जरी बंगालने बेंगलुरु बुल्सचा सर्व संघ एकदा बाद केले तरी बेंगलुरु बुल्सने सुपर टॅकल्स केल्यामुळे बंगालकडे फक्त एक गुणांची आघाडी होती.
दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघ जवळ जवळ ‘डु ऑर डाय रेड’ वरच खेळत होते पण नेमकी तेव्हाच ली आणि मणिंदर बाद झाले. अजय कुमारने डू ओर डाय रेडमध्ये सुपर रेड केली आणि चार गुण मिळवले. जेव्हा स्कोर १६-१६ आसा होता तेव्हा त्याने तब्ब्ल ४ गुण बेंगलुरु बुल्सच्या संघासाठी कमवले आणि शेवटी ही रेडच दोन्ही संघामधील फरक ठरली. हा सामना ३१-२५ असा बेंगलुरु बुल्सने जिंकला. या विजयासह ते ‘झोन बी’मध्ये ते पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.