प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (29 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पुणेरी पलटण संघाला गुजरात जायंट्सने 51-39 असे पराभूत करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. तर, दिवसातील दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने यु मुंबाला 35-33 असे पछाडले.
हैदराबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिला सामना विजयरथावर आरूढ असलेल्या पुणेरी पलटण व गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असलेल्या गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान झाला. या सामन्यात गुजरात संघ कोणताही दबाव न घेता खेळताना दिसला. त्यांनी सुरुवातीपासूनच पुण्याच्या बचावपटूंवर आक्रमण केले. युवा रेडर प्रतीक दहिया याने गुजरातच्या आक्रमणाचे नेतृत्व केले.
𝔾𝕒𝕣𝕛𝕒 𝕙𝕒𝕚 𝔾𝕦𝕛𝕒𝕣𝕒𝕥 𝕚𝕟 𝔾𝕚𝕘𝕒𝕟𝕥𝕚𝕔 𝕤𝕥𝕪𝕝𝕖 🗣️
They claim a much-needed win against the Paltan 💪#vivoProKabaddi #FantasticPanga #PUNvGG pic.twitter.com/sKRWpTlUQ7
— ProKabaddi (@ProKabaddi) November 29, 2022
दुसरीकडे पुणे संघासाठी सर्व खेळाडूंनी योगदान दिले. तीन रेडर्सने मिळून पुणे संघासाठी 22 गुण कमावले. तर, फझल व अबिनेश यांनी डिफेन्समध्ये प्रत्येकी चार गुण आपल्या नावे केले. मात्र, प्रतीक दहीयाने घेतलेल्या 19 गुणांमुळे पुणे संघाला पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतरही पुणेरी पलटण गुणतालिकेत पहिल्या स्थानी कायम आहे.
A Dhaakad comeback to grab 5️⃣ points 🔥
𝘏𝘢𝘳𝘺𝘢𝘯𝘢 𝘯𝘦 𝘪𝘴𝘴 #FantasticPanga 𝘮𝘦𝘪𝘯 𝘭𝘢𝘵𝘩 𝘨𝘢𝘢𝘥 𝘥𝘪 💪#vivoProKabaddi #HSvMUM pic.twitter.com/DHRPRT9eSe
— ProKabaddi (@ProKabaddi) November 29, 2022
दिवसातील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राचा आणखी एक संघ यु मुंबा सहभागी झाला होता. हरियाणा स्टीलर्स संघाने त्यांना आव्हान देत पहिल्य हाफमध्ये बरोबरीचा खेळ केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये कर्णधार नितीन रावलने हरियाणा संघाला पुनरागमन करून दिले. त्याला संघाच्या सर्व रेडर्सने साथ देत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या तीन मिनिटात हरियाणाने आक्रमण करत सामना आपल्या बाजूने झुकवला. पूर्ण वेळानंतर हरियाणाने 35-33 असा विजय संपादन केला.
(pro kabaddi puneri paltan and u mumba lost)