नुकतीच इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वातील दुसरा सामना शनिवारी (१० एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दिल्लीचा नवनियुक्त कर्णधार रिषभ पंत याच्यापुढे चेन्नईचा अनुभवी कर्णधार एमएस धोनीला पराभूत करण्याचे आव्हान असणार आहे. अशात उभय संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल दिसू शकतात. परंतु गतवर्षीच्या संघातील अधिकतर खेळाडू यंदाही कायम असल्याचे दिसेल.
धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघात नवोदित शिलेदार रॉबिन उथप्पाला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. चेन्नईने यंदा या अनुभवी खेळाडूला राजस्थान रॉयल्समधून ट्रेड करत आपल्या ताफ्यात सामील केले आहे. याबरोबरच अनकॅप खेळाडू कृष्णप्पा गौतम यालाही अंतिम ११ जणांच्या पथकात जागा मिळू शकते.
तसेच आयपीएल २०२० मध्ये शेवटच्या सामन्यात प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडलाही स्थान मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या अनुपस्थित दिल्ली संघ नवा कर्णधार पंतसह मैदानावर उतरेल. या सामन्यात दिल्लीचे दोन प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए हेदेखील नसतील. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण न झाल्याने त्यांना या सामन्यातून बाहेर राहावे लागणार आहे. याबरोबरच अनुभवी शिलेदार स्टिव्ह स्मिथ यालाही या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे ठरल्यात जमा आहे.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसीस, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकुर, दीपक चाहर, कृष्णप्पा गौतम
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमायर, रिषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रिस वोक्स, आर अश्विन, उमेश यादव, अमित मिश्रा, इशांत शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
“पहिला सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे अधिक महत्त्वाचे,” पराभवानंतरही रोहितचे मोठे भाष्य
पहिल्याच सामन्यात विराटच्या पलटणने उडवला मुंबईचा धुव्वा, ‘हे’ ठरले आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार