---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर भागवत चंद्रशेखर

---Advertisement---

संपुर्ण नाव- भागवत सुब्रमन्य चंद्रशेखर

जन्मतारिख- 17 मे, 1945

जन्मस्थळ- म्हैसूर, कर्नाटक

मुख्य संघ- भारत, कर्नाटक आणि म्हैसूर

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकीपटू गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 21 ते 26 जानेवारी, 1964

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 22 फेब्रुवारी, 1976

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 58, धावा- 167, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 58, विकेट्स- 242, सर्वोत्तम कामगिरी- 8/79

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 1, धावा- 11, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 3/36

थोडक्यात माहिती- 

-भागवत चंद्रशेखर यांना लहानपणी ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू रिची बेनॉड (Richie Benaud) यांची खेळण्याची शैली खूप आवडत होती. त्यांना खेळताना पाहूनच चंद्रशेखर यांच्यात क्रिकेटची आवड निर्माण झाली.

-वयाच्या 6व्या वर्षी चंद्रशेखर यांचा उजवा हात पोलिओमुळे अपंग आला. मात्र, वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी याच हाताचा वापर करत क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

-त्यांचे कुटुंब पुढे बंगलोर येथे स्थाईक झाले आणि त्यांना तेथे क्लबमध्ये क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. ते सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करत होते. नंतर 1963मध्ये त्यांनी फिरकीपटू गोलंदाजीस सुरुवात केली. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय संघात निवड होण्यास मदत झाली.

-1963मध्ये त्यांनी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातून कसोटीत पदार्पण केले. त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच 4 विकेट्स घेतल्या. त्यांना 1964 सालचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आला होता.

-चंद्रशेखर वेगवेगळ्या प्रकारची गोलंदाजी करू शकत होते. बाउन्सर, गुगली आणि लेग ब्रेक यांचा यात समावेश होतो.

-1960 आणि 70च्या दशकात ईरापल्ली प्रसन्ना, बिशन सिंग बेदी आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांच्यासह चंद्रशेखर यांचेही भारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकीपटू गोलंदाजांमध्ये नाव घेतले जात होते.

-शिवाय 1971मध्ये ओव्हल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात चंद्रशेखर यांनी 38 धावा देत 6 विकेट्स घेत प्रथमच भारताला इंग्लंडमध्ये मालिकाविजय मिळवून दिला होता.

-त्यांच्या गोलंदाजीतील कामगिरीमुळे त्यांना 1972 साली विस्डन क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

-याव्यतिरिक्त त्यांना 1972 साली भारत सरकारकडून अर्जून पुरस्कार देण्यात आला होता.

-तसेच क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना 1972ला पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

-1976 ला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चंद्रशेखर आणि प्रसन्ना यांनी मिळून 19 विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता.

-तसेच, 1978मध्ये मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातील त्यांच्या 104 धावांवरील 12 विकेट्स अविस्मरणीय आहेत. त्यावेळी तो भारताचा ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी विजय होता.

-त्यांच्यामध्ये फलंदाजी कौशल्य जास्त प्रमाणात नव्हते. भारत 1977-78मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना 4वेळा शून्यावर धावबाद झाल्यामुळे त्यांना ग्रे निकोलस यांची बॅट देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, 58 कसोटी सामन्यात त्यांनी 23वेळा शून्यावर धावबाद होण्याचा पराक्रम केला होता.

-असे असले तरी त्यांनी कसोटी कारकिर्दीत 58 सामने खेळत 167 धावाच केल्या. मात्र, 242 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---