पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू जेम्स फॉकनर (james faulkner) याने फ्रेंचायझी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर त्याला पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप केला आहे. त्याने पीएसएल सोडल्यानंतर सोशल मीडियावर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यावर पीसीबीचे उत्तर आले असून फॉकनर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तेथून जाण्यापूर्वी त्याने तोडफोड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू जेम्स फॉकनरने ट्विट करत म्हटले आहे की, “मी पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. परंतु पीसीबीकडून मला निश्चित मानधन न मिळाल्यामुळे मला शेवटच्या दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आणि पीएसएल सोडावी लागली. मी सुरुवातीपासूनच येथे आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्याशी खोटे बोलत होते.”
https://twitter.com/JamesFaulkner44/status/1494975761144504327?s=20&t=XyNStLgUz2e1gFDQHTerVg
फॉकनर आणखीन एक ट्वीट करत म्हणाला, “लीग सोडताना मला दुःख होत आहे. कारण मला पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्यासाठी मदत करायची होती. कारण येथे खूप तरुण आहेत आणि चाहते सुद्धा खूप आहेत. पण माझ्यासोबत ज्या पद्धतीने व्यवहार केला गेला, तो पीसीबी आणि पीएसएलच्या वतीने अपमानास्पद आहे. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना माझी स्थिती समजत असेल.”
https://twitter.com/JamesFaulkner44/status/1494976081581215744?s=20&t=qJovoJ5tZ-9FNAeHu7_mUw
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जेम्स फॉकनरचे आरोप फेटाळून लावले असून त्याच्यावर पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यास आजीवन बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या मीडिया चॅनेलमध्ये असे सांगितले जात आहे की, फॉकनरने चेक आउट करण्यापूर्वी हॉटेलमध्ये तोडफोड केली आहे. एका झुंबरचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो त्याच हॉटेलचा असल्याचे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार फॉकनरने दारू पिऊन केल्याचा आरोपही केला जात आहे.
https://twitter.com/drbulandiqbal/status/1495072036925980674?s=20&t=Bl7XHfWuYaR_LkVu2tczNw
https://twitter.com/TheRealPCB/status/1495026673414193159?s=20&t=-PJXt5zcms7uZeCj-uI03Q
जेम्स फॉकनर पीएसएल २०२२ मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा भाग होता. या संघाची स्पर्धेतील कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. क्वेटा ९ सामन्यांतून केवळ ३ विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. जेम्स फॉकनरने पीएसएल २०२२ मध्ये सहा सामन्यांमध्ये भाग घेतला होता. यादरम्यान त्याने ४९ धावा करण्यासोबतच सहा विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: गुजरात जायंट्सचा यू मुंबावर महत्त्वपूर्ण विजय, प्लेऑफमध्ये मारली धडक
प्रो कबड्डी: पुणेरी पलटणची जयपूर पिंक पँथर्सवर ७ गुणांनी मात, पण फायदा मात्र बंगळुरू बुल्स संघाचा