मुंबई रणजी संघाचा माजी कर्णधार अभिषेक नायरला पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनने मोठा प्रस्ताव दिली आहे.
2018-19 च्या रणजी मोसमात पॉंडेचरी क्रिकेट संघ देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण कराणार आहे.
त्यासाठी देशांतर्गत क्रिकेटचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या नायरला पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनने पॉंडेचरी संघात प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणुन समाविष्ट होण्याचा प्रस्ताव दिला आहे.
“अभिषेककडे देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्याच्या या अनुभावाचा आमच्या संघाच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पदार्पणासाठी मोठा लाभ होऊ शकतो.” असे पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनचे सचिव पी दामोदरन यांनी सांगितले.
यावेळी अभिषेक नायरनेही त्याला पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनचा प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणुन संघात समाविष्ट होणाच्या प्रस्तावाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
“पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनचा प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणुन पॉंडेचरी संघात समाविष्ट होण्याचा प्रस्ताव मिळाला आहे. मी प्रशिक्षक होण्याबाबत कोणताही विचार केला नाही. मात्र खेळाडू म्हणुन सहभागी होण्याबाबत विचार सुरु आहे.” असे नायरने सांगितले.
अशी आहे अभिषेक नायरची देशांतर्गत क्रिकेट कारकिर्द-
अभिषेक नायरने 99 प्रथम श्रेणी सामन्यात 5284 धावा आणि 164 बळी मिळवले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे नायरने देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणुन नाव कमावले आहे. तसेच भारतीय संघाकडून ३ सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?
-ये कौन हैं, कहासे पकडके लाते हो? गांगुलीच्या राग जेव्हा अनावर झाला